Bigg Boss OTT 3: पायलने दुसऱ्या पुरुषाला आणलं असतं तर? सनाच्या प्रश्नावर युट्यूबर अरमान मलिकची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 01:06 PM2024-06-27T13:06:47+5:302024-06-27T13:08:16+5:30

Bigg Boss OTT 3: सनाच्या एका प्रश्नाने अरमानची बोलती बंद झालेली पाहायला मिळत आहे. या प्रश्नामुळे सनाचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. 

Bigg Boss OTT 3 Sana Makbul asks Armaan Malik a question to which he couldnt answer | Bigg Boss OTT 3: पायलने दुसऱ्या पुरुषाला आणलं असतं तर? सनाच्या प्रश्नावर युट्यूबर अरमान मलिकची बोलती बंद

Bigg Boss OTT 3: पायलने दुसऱ्या पुरुषाला आणलं असतं तर? सनाच्या प्रश्नावर युट्यूबर अरमान मलिकची बोलती बंद

बिग बॉस OTT 3 मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये युट्यूबर अरमान मलिकची खूप चर्चा आहे. अरमान आपल्या दोन्ही पत्नींना घेऊन बिग बॉसमध्ये आला आहे. त्याला प्रवेश दिल्याने बिग बॉसच्या मेकर्सवरही टीका होत आहे. दरम्यान अरमान आणि सना मकबूलचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये सनाच्या एका प्रश्नाने अरमानची बोलती बंद झालेली पाहायला मिळत आहे. या प्रश्नामुळे सनाचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. 

व्हिडिओमध्ये सना अरमानला विचारते, 'जर भूमिका उलटी केली तर? म्हणजे तुझ्या जागी जर पायल दुसऱ्या माणसाला घेऊन घरी आली असती तर तू काय केलं असतं? यावर अरमान विचारतो, 'ती काय त्याला घरी आणून ठेवेल?' सना म्हणते, 'हो! मग तू काय केलं असतं?' यानंतर अरमानची बोलतीच बंद होते. तो म्हणतो, 'नाही, ही पण काही गोष्ट आहे. याचा उत्तर थोडीच असणारे.'

याआधी अनेक सेलिब्रिटींनी अरमानवर टीका केली आहे. अभिनेता करण कुंद्राने व्हिडिओ शेअर करत अरमानची खिल्ली उडवली. बिग बॉस 17 मधील तहलका उर्फ सनी आर्याच्या पत्नीनेही अरमानला असाच सवाल केला होता. ती म्हणाली होती की जर एखाद्या महिलेने दोन पुरुषांना घेऊन घरात प्रवेश केला असता तर हंगामा झाला असता.

Web Title: Bigg Boss OTT 3 Sana Makbul asks Armaan Malik a question to which he couldnt answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.