Bigg Boss OTT 3: बिग बॉसने जेवण न दिल्याने सना मकबूलचा संयम सुटला, थेट दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 10:16 AM2024-06-27T10:16:19+5:302024-06-27T10:17:20+5:30

बिग बॉसमधील स्पर्धक सना मकबूलने थेट निर्मात्यांना धमकी दिली आहे. त्यामुळे सर्वांंच्या भूवया उंचावल्या आहेत (sana maqbool, bigg boss ott 3)

Bigg Boss OTT 3 Sana Maqbool loses her temper after Bigg Boss doesn't serve food threatens producer | Bigg Boss OTT 3: बिग बॉसने जेवण न दिल्याने सना मकबूलचा संयम सुटला, थेट दिली धमकी

Bigg Boss OTT 3: बिग बॉसने जेवण न दिल्याने सना मकबूलचा संयम सुटला, थेट दिली धमकी

Bigg Boss OTT 3 ची सध्या चांगलीच चर्चा आहे. यंदाच्या बिग बॉस सीझनमध्ये नवनवीन स्पर्धक सहभागी झाले आहेत. Bigg Boss OTT 3 चं सूत्रसंचालन अनिल कपूर करत आहेत. Bigg Boss OTT 3 मध्ये एक अशी गोष्ट घडलीय जी वाचून सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. घरात अन्नपदार्थांचा पुरवठा बंद केल्याने सना मकबूलने थेट बिग बॉसच्या निर्मात्यांना धमकी दिली आहे. असं काय घडलंय नेमकं?

सना मकबूलने दिली धमकी

अलीकडील एपिसोडमध्ये मध्ये बघायला मिळतंय की घरातील सदस्य जी फेक एकजूट दाखवत आहेत त्यामुळे बिग बॉसने सर्वांना शिक्षा सुनावली आहे. बिग बॉसने घरात अन्नपदार्थांचा पुरवठा बंद केलाय. त्यामुळे घरातील सदस्य सना मकबूलचा संयम सुटलाय. तिने निर्मात्यांवर कायदेशीर कारवाईची धमकी दिली. तिने रागाच्या भरात निर्मात्यांना फटकारले आणि म्हणाली की, "उपासमार करणं माझ्या करारात नाही. जर तुम्हाला असंच आम्हाला उपाशी ठेवायचं असेल तर आम्ही कायदेशीररित्या गोष्टी हाताळू." सध्या बिग बॉसने बजेटच्या तुलनेत राशन संपल्याने सर्वांना फक्त फळं आणि पाण्यावर जगण्यास सांगितले आहे.

Bigg Boss OTT 3 मधून पहिला स्पर्धक घराबाहेर?

बिग बॉस ओटीटी 3 मधून पहिला स्पर्धक घराबाहेर गेलाय अशी चर्चा आहे. बिग बॉसविषयी जे खबरी पेज असतात त्यांनी याविषयी माहिती दिली. या आठवड्यात मिड विक एविक्शनसाठी शिवानी कुमार आणि बॉक्सर नीरज गोयत हे दोघे नॉमिनेट होते. या दोघांपैकी बॉक्सर नीरजला घराबाहेर जावं लागल्याची चर्चा आहे. खबरी पेजनुसार शिवानीपेक्षा कमी वोट मिळाल्याने नीरजची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झालीय. 

Web Title: Bigg Boss OTT 3 Sana Maqbool loses her temper after Bigg Boss doesn't serve food threatens producer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.