शिवानी कुमारीने माती खाल्ली! इतरांनी मस्करी केल्यावर म्हणाली- "गावावरुन आणलीय त्यामुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 04:50 PM2024-06-25T16:50:18+5:302024-06-25T16:51:21+5:30

Bigg Boss OTT 3 मध्ये शिवानी कुमारीने माती प्राशन केली. त्यामुळे घरातील इतर सदस्यांनी तिची चांगलीच मस्करी केली.

bigg boss ott 3 Shivani Kumari ate soil video viral with luv kataria | शिवानी कुमारीने माती खाल्ली! इतरांनी मस्करी केल्यावर म्हणाली- "गावावरुन आणलीय त्यामुळे..."

शिवानी कुमारीने माती खाल्ली! इतरांनी मस्करी केल्यावर म्हणाली- "गावावरुन आणलीय त्यामुळे..."

 Bigg Boss OTT 3 मध्ये काहीच दिवसांपुर्वी सुरु झालंय. यंदा प्रथमच सलमान खानऐवजी अनिल कपूरबिग बॉसच्या नवीन पर्वांचं होस्टिंग करतोय. काहीच दिवसांपूर्वी Bigg Boss OTT 3 ची ग्रँड ओपनिंग झाली. या सीझनमध्ये उत्तर प्रदेशमधील इनफ्ल्यूएन्सर शिवानी कुमारी सहभागी झालीय. शिवानी कुमारीने घरात गावावरुन आणलेली माती खाललीय. त्यामुळे सदस्यांनी तिची मस्करी केलीय. शिवानीने सुद्धा त्यांना सडेतोड उत्तर दिलंय.

शिवानीवर का आली माती खाण्याची वेळ

Bigg Boss OTT 3 मध्ये खाद्यपदार्थांसाठी लढाई सुरू झाली आहे.  एका व्हायरल क्लिपमध्ये घरातील प्रत्येकजण मोरिंगा (काढायुक्त) पाणी  पीत असल्याचे दिसत आहे. खायला मिळण्यासाठी बिग बॉसचे स्पर्धक आपला राग इतरांवर काढत आहेत. सर्व  स्पर्धक भुकेने व्याकूळ झाले आहेत. अशातच प्रचंड भूक लागल्याने शिवानीने गावावरुन आणलेली माती खाल्ली.

यामुळे इतर स्पर्धकांनी शिवानीची चांगलीच मस्करी केली. ती म्हणाली, "भाऊ ही माती गावावरुन आणलीय मी. भूक लागलीय मला तर मी काय करु?" कोणाला काहीच खायला न मिळाल्याने शिवानीने अशी माती खाऊ नये, असं इतरांचं म्हणणं आहे.

बिग बॉसने सर्वांना का ठेवलंय उपाशी?

बिग ओटीटी 3 मध्ये घरी रेशन नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. ब्रेकिंग न्यूज म्हणजे बिग बॉसच्या घरात सगळे पाणी पीत आहेत. दुपारच्या जेवणात स्पर्धकांना मोरिंगा पाणी देण्यात आले. यानंतर प्रत्येकजण कॅमेऱ्यात काही कार्बोहायड्रेट किंवा अन्नाची मागणी करतो. प्रत्येकजण हात जोडून बिग बॉसला विनंती करतो. बिग बॉसने प्रत्युत्तर दिले की,  घरातील लोक चुकीचे आहेत. त्यांना वाटतंय बनावट एकजूट दाखवून बिग बॉसचे हृदय जिंकलीत. त्यामुळे बिग बॉसने सर्वांना शिक्षा दिलीय

Web Title: bigg boss ott 3 Shivani Kumari ate soil video viral with luv kataria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.