बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 09:53 AM2024-10-02T09:53:26+5:302024-10-02T09:54:45+5:30

बिग बॉस ओटीटीमध्ये झळकलेला सोशल मीडिया स्टार अदनान शेखच्या बहिणीने भावाच्या लग्नाविषयी खुलासा केलाय

Bigg Boss ott fame Adnan Sheikh wife changed religion after marriage shocking revealation from adnaan sheikh sister | बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वात झळकलेला सोशल मीडिया स्टार म्हणजे अदनान शेख (adnaan sheikh). अदनानने काहीच दिवसांपूर्वी थाटामाटात लग्न केलं. अदनानच्या लग्नाला बिग बॉस ओटीटी ३ ची विजेती सना मकबूल याशिवाय त्याचे बिग बॉस मधील मित्र मैत्रिणी उपस्थित होती. अदनान शेखने त्याच्या लग्नात त्याच्या पत्नीचा चेहरा दाखवला नव्हता. त्याच्या पत्नीबद्दल आता अदनानच्या बहिणीने थक्क करणारा खुलासा केलाय. एका मराठी मुलीशी अदनानने लग्न केलंय. याशिवाय पत्नीने लग्नानंतर धर्म बदलल्याचा खुलासा अदनानच्या बहिणीने केलाय. 

अदनानच्या पत्नीबद्दल बहिणीने केला खुलासा

अदनानच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली. इतकंच नव्हे तर लग्नानंतर अदनानची बहीण इफतने त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला होता. अदनानच्या बहिणीने असा दावा केलाय की, अदनानची पत्नी ही हिंदू असून तिचं आधीचं नाव रिद्धी जाधव असं आहे. रिद्धीने अदनानशी लग्न करण्याआधी तिचा धर्म बदलला असल्याचा गंभीर खुलासा अदनानच्या बहिणीने केलाय. अदनानशी लग्न करण्यासाठी रिद्धीने इस्लाम धर्म स्वीकरला असून तिने स्वतःचं नावही बदललं आहे. रिद्धी हे नाव बदलून तिने आयशा हे नाव ठेवलंय.


अदनानने पत्नीबद्दल केलेली ही विनंती

अदनानने जेव्हा लग्न केलं तेव्हा त्याने मीडिया आणि पापाराझींना विनंती केली होती की, त्यांनी त्याच्या पत्नीचा चेहरा दाखवू नये. त्यामुळे अदनानची पत्नी संपूर्ण लग्नात चेहऱ्यावर मास्क लावून होती. आता अदनानच्या बहिणीने थेट इंन्स्टाग्रामवर अदनानच्या पत्नीचा फोटो दाखवत तिच्या पुर्वायुष्याबद्दल खुलासा केलाय. आता पत्नी खरंच हिंदू असून तिने लग्नासाठी धर्म बदलला का? याविषयी अदनान स्वतः काय खुलासा करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.

 

Web Title: Bigg Boss ott fame Adnan Sheikh wife changed religion after marriage shocking revealation from adnaan sheikh sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.