Then & Now: विश्वास बसणार नाही, पण ही उर्फी आहे...! 10 वर्षांत इतकी बदलली उर्फी जावेद!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 15:26 IST2022-01-04T15:26:24+5:302022-01-04T15:26:49+5:30
Urfi Javed Shocking Transformation : गेल्या 10 वर्षांत उर्फीमध्ये इतका बदल झालाय की, क्षणभर तुमचाही विश्वास बसणार नाही.

Then & Now: विश्वास बसणार नाही, पण ही उर्फी आहे...! 10 वर्षांत इतकी बदलली उर्फी जावेद!!
‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) आधी उर्फी जावेद (Urfi Javed) हे नाव फार कोणी ओळखत नव्हतं. म्हणायला या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. होय, ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी सतत चर्चेत असते ती तिच्या फॅशन सेन्समुळे. अनेकदा ती बोल्ड, ग्लॅमरस कपडे घालून मिरवताना दिसते आणि यामुळे दर दिवसाआड सोशल मीडियावर ट्रेंड करते. अनेकदा कपड्यांमुळे उर्फी ट्रोलही होते. पण बिनधास्त, बेफिक्रे उर्फीला यामुळे जराही फरक पडत नाही. अर्थात आज या बोल्ड, बिनधास्त उर्फीबद्दल नाही तर 10 वर्षांआधीच्या उर्फीबद्दल आम्ही सांगणार आहोत. होय, गेल्या 10 वर्षांत उर्फीमध्ये इतका बदल झालाय की, क्षणभर तुमचाही विश्वास बसणार नाही.
आज उर्फीला 2.1 मिलियन युजर्स फॉलो करतात. तिच्या ग्लॅमरस व बोल्ड फोटोंनी तिचं इन्स्टा अकाऊंट भरलेलं आहे. याच अकाऊंटवर खूप आधी उर्फीने तिचे काही थ्रोबॅक फोटोही शेअर केले आहेत.
शाळेतले, कॉलेजातले अनेक फोटो पाहून हीच उर्फी यावर क्षणभर विश्वास बसत नाही. मास कम्युनिकेशनची पदवी घेतल्यानंतर उर्फी हळूहळू फॅशन वर्ल्डमध्ये आली आणि नंतर ग्लॅमर वर्ल्डमध्ये तिने एन्ट्री घेतली. ग्लॅमर वर्ल्डमध्ये आल्यानंतर उर्फी प्रचंड बदलली. तिच्यातील हा बदल थक्क करणारा आहे.
उर्फी चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र 8 व्या दिवशीच ती घरातून बेदखल झाली. तेव्हापासून ती कपड्यांमुळेच चर्चेत असते.