प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ओठांचा कुत्र्याने घेतला चावा; Bigg boss OTT 3 मध्ये सांगितला भितीदायक प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 10:09 AM2024-06-23T10:09:54+5:302024-06-23T10:10:22+5:30

Sana makbul: लॉकडाउनच्या काळात सनावर एका कुत्र्याने हल्ला केला होता.

bigg-boss-ott-season-3-sana-makbul-lips-bitten-by-a-dog-in-lockdown-2020 | प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ओठांचा कुत्र्याने घेतला चावा; Bigg boss OTT 3 मध्ये सांगितला भितीदायक प्रसंग

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ओठांचा कुत्र्याने घेतला चावा; Bigg boss OTT 3 मध्ये सांगितला भितीदायक प्रसंग

 बिग बॉस ओटीटीचं  (Bigg boss OTT 3) तिसरं पर्व नुकतंच सुरु झालं आहे. या नव्या पर्वात सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत चर्चेत राहिलेल्या अनेकांनी सहभाग घेतला आहे. यामध्येच शोमध्ये सहभागी झालेल्या १६ स्पर्धकांपैकी अभिनेत्री सना मकबूलची (sana makbul) नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सनाने या शोमध्ये तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.

Bigg boss OTT 3 हा शो सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सना मकबूल आणि पॉलोमी दास या दोघींची चांगली गट्टी जमल्याचं दिसून येत आहे. या दोघींनी त्यांच्या आयुष्यातील बरेच किस्से आणि घटना एकमेकींसोबत शेअर केले आहेत. यात या दोघी किचनमध्ये काम करत असतांना पॉलोमी हिने सनाच्या ओठांजवळ असलेल्या जखमेविषयी विचारलं. या जखमेविषयी बोलत असतांना सनाने तिच्यासोबत घडलेला भितीदायक प्रसंग सांगितला.

"माझ्या ओठांवर असलेल्या या खुणेमुळे सकाळी शिवानीला हसू आलं होतं. पण, ती खूण कसली आहे किंवा किती त्रासदायक आहे हे माझं मलाच माहित आहे. मला एका मोठ्या सर्जरीमधून जावं लागलं आहे. एका कुत्र्याने माझ्या ओठांचा चावा घेतला होता त्यामुळे माझ्या ओठांवर ही खूण आहे", असं सना म्हणाली.

सनाने Bigg boss OTT 3 पूर्वी खतरों के खिलाडी या स्टंट रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. या शो मध्ये जाण्यापूर्वी तिने एका मुलाखतीमध्ये तिच्यासोबत घडलेल्या या प्रसंगावर भाष्य केलं होतं. २०२० मध्ये एका कुत्र्याने सनावर हल्ला केला होता. या हल्ल्यात कुत्र्याने तिच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर अनेक ठिकाणी चावा घेतला होता. कुत्र्याने केलेल्या या जबरदस्त हल्ल्यामुळे तिचे ओठ फाटले होते ज्यामुळे तिला प्लास्टिक सर्जरी आणि ग्राफ्टिंगसह अनेक शस्त्रक्रियांना सामोरं जावं लागलं होतं.

दरम्यान, Bigg boss OTT 3 हा कार्यक्रम २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या पर्वात चर्चेत राहिलेले अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्युएर्न्सनी सहभाग घेतला आहे. यात अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी तसंच दिल्लीची वडापाव गर्ल ये सोशल मीडिया स्टारही चर्चेत आहेत.

Web Title: bigg-boss-ott-season-3-sana-makbul-lips-bitten-by-a-dog-in-lockdown-2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.