इथे ये आणि मला किस कर...; शमिता शेट्टी व राकेश बापटची रोमॅन्टिक केमिस्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 10:31 AM2021-08-29T10:31:35+5:302021-08-29T10:34:31+5:30
Bigg Boss OTT: ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये प्रेमाचे वारे...! पाहा व्हिडीओ
‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT ) हा शो सध्या स्पर्धकांच्या भांडणासोबतच शमिता शेट्टी (Shamita Shetty) व राकेश बापट (Raqesh Bapat) यांच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत आला आहे. होय, बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे वाहू लागलेय. सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा आहे.
सकाळी उठल्या उठल्या शमिताला किस करणे, दिवसभर तिची काळजी घेणे अन् अगदी रात्रीला तिचे पाय चेपून देण्यापर्यंतच्या एक ना अनेक गोष्टी राकेश बापट करताना दिसतोय. आता काय तर शमिता व राकेश यांच्यातील एका रोमॅन्टिक क्षण पहाला मिळतो आहे. होय, बिग बॉस ओटीटीचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आणि हा प्रोमो पाहिल्यानंतर शमिता व राकेशच्या रोमॅन्टिक केमेस्ट्रीची पुन्हा चर्चा रंगली.
या प्रोमोमध्ये शमिता जेवताना दिसतेय. राकेश माइक्रोवेवमध्ये जेवण गरम करतोय. शमिता राकेशला काही सूचना देताना दिसतेय. यावर राकेश तिला ‘आणखी काही?’ असा प्रश्न करतो. पण राकेशचा हा प्रश्न शमिताला खटकतो आणि ती त्याच्याकडे जरा रोखून बघते. तुला काही प्रॉब्लेम आहे का? असा प्रश्न पाठोपाठ शमिता करते. तिच्या प्रश्नावर तुझ्याकडे बोलण्यासाठी काही आहे का इतकंच विचारत होतो? असे म्हणतो. हे संभाषण सुरू असताना इथे ये आणि आधी मला एक किस कर, असे शमिता म्हणते आणि राकेश लगेच तिच्या जवळ जात तिच्या गालावर किस करतो. हा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होतो.
काही दिवसांपूर्वी राकेश शमिताचे पाय चेपताना दिसला होता. किचनची ड्युटी करून शमिता थकली होती. त्यामुळे त्याने तिचे पाय चेपले होते. हा व्हिडीओही असाच तुफान व्हायरल झाला होता.
पहिल्या आठवड्यात शमिता व राकेश यांच्या वारंवार खटके उडाले होते. परंतु दुस-या आठवड्यात दोघांत असे काही ट्युनिंग जमू लागले की, आता राकेश व शमिता दोघेही एकमेकांसोबतच दिसतात. अगदी एकमेकांशिवाय दोघांचे पानही हलत नाही. अगदी पर्सनल लाईफमधील गोष्टी शेअर करण्यापासून तर टास्कमध्ये एकमेकांना सोबत देण्यापर्यंत दोघांतही जबदस्त बॉन्डिंग दिसून येतेय.