'बिग बॉस' शो टेलिव्हिजनवर सुरू होण्याच्या ६ आठवडेआधी सुरू होणार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 05:52 PM2021-07-09T17:52:30+5:302021-07-09T17:52:53+5:30

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे.

The 'Bigg Boss' show will air on this OTT platform 6 weeks before it starts on television. | 'बिग बॉस' शो टेलिव्हिजनवर सुरू होण्याच्या ६ आठवडेआधी सुरू होणार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर

'बिग बॉस' शो टेलिव्हिजनवर सुरू होण्याच्या ६ आठवडेआधी सुरू होणार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे. हा शो टेलिव्हिजनवर दाखल होण्यापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्म वूटवर पहायला मिळणार आहे. 'बिग बॉस ओटीटी'च्‍या सहा महिन्‍यांच्‍या कार्यक्रमाचे पहिले सहा आठवडे चाहत्‍यांना २४X७ तास त्‍यांच्‍या मोबाइलवर पाहता येणार आहेत. ज्‍यामुळे त्‍यांना लोकप्रिय घरामध्‍ये चाललेल्‍या घडामोडी जाणून घेण्‍यासोबत शोचा प्रत्‍यक्ष व सखोल सहभागासह आनंद घेता येणार आहे. 

भारतीय मनोरंजन क्षेत्रातील काही सेन्‍सेशल व्‍यक्‍ती, लोकप्रिय चेहरे व प्रभावक 'बिग बॉस ओटीटी'ला अनेक ड्रामा, मेलो ड्रामा व भावनांसह नव्‍या उंचीवर घेऊन जातील. यावेळी 'जनता' फॅक्‍टर सामान्‍य व्‍यक्‍तीला स्‍पर्धकांची, तसेच स्‍पर्धकांचे स्‍टे, टास्‍क्‍स व शोमधील त्‍यांचे अस्तित्त्व याबाबत निवड करत बिग बॉस ओटीटीची असामान्‍य शक्‍ती देणार आहे. एकूण नवीन सीझन लोकांना लोकांद्वारे अद्वितीय अनुभव देण्‍याचे वचन देतो.

यंदाच्या शोमध्ये अमर्यादीत ड्रामा

वर्षानुवर्षे प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळालेला वार्षिक मनोरंजनपूर्ण शो 'बिग बॉस' हा भारतातील मनोरंजन क्षेत्रातील सर्वात बहुप्रतिक्षित व प्रशंसित शोजपैकी एक आहे. आणि यंदा हा शो अमर्यादित ड्रामा, तसेच देशातील दुसरी सर्वात मोठी डिजिटल व्हिडिओ-ऑन-डिमांड स्ट्रिमिंग सेवा वूट या नवीन गंतव्‍यापर्यंत आपली उपस्थिती वाढवत नव्‍या उंचीवर पोहोचला आहे.

Web Title: The 'Bigg Boss' show will air on this OTT platform 6 weeks before it starts on television.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.