बिग बॉस मराठीतील ही स्पर्धक लग्नाआधीच बनली होती आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 11:46 IST2018-04-19T06:16:28+5:302018-04-19T11:46:28+5:30
बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. या कार्यक्रमात सध्या मेधा धाडे स्पर्धकाच्या भूमिकेत आपल्याला ...

बिग बॉस मराठीतील ही स्पर्धक लग्नाआधीच बनली होती आई
ब ग बॉस मराठी हा कार्यक्रम सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. या कार्यक्रमात सध्या मेधा धाडे स्पर्धकाच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहे. बिग बॉसच्या घरात सगळीच मंडळी मजा-मस्ती करताना दिसत आहेत. त्याचसोबत ते एकमेकांची दुःख, एकमेकांच्या आयु्ष्यातील चांगल्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर करत आहेत. मेधा धाडेने तिच्या आयुष्याविषयी अनेक गोष्टी बिग बॉसमधील तिच्या मित्रमैत्रिणींना सांगितल्या. या सगळ्या गोष्टी ऐकून घरातील सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तिने या कार्यक्रमात सांगितले की, मी लग्नाच्या आधीच आई बनली होती. लहान वयात काही चुका माझ्याकडून घडल्या आणि मी अतिशय लहान वयात गरोदर झाले. यानंतरचे माझे आयुष्य खूपच खडतर होते. जगणे देखील मला मुश्किल झाले होते. त्यात माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. माझ्या घरातल्यांनी वडिलांच्या मृत्यूसाठी मलाच जबाबदार धरले. माझा भाऊ तर कित्येक वर्षं माझ्याशी बोलत नव्हता. पण या सगळ्यात आईने मला आधार दिला. आईमुळेच ती मराठी चित्रपटसृष्टीचा भाग बनू शकले. एक काळ असा होता की, माझ्या घरातील कोणीच मला समजून घेत नाही असे मला वाटत होते आणि त्यामुळेच मी काही बाहेरील लोकांना माझ्या आयुष्यात जास्त स्थान दिले आणि माझ्या आयुष्यात काही चुका झाल्या. मी खूपच लहान वयात आई झाले. पण तरीही या सगळ्यात मी माझे करिअर बनवले. मला आजवर खूप चांगल्या भूमिका साकारण्याची संधी मिळालेली नाही. पण तरीही मी माझ्या करिअरमध्ये खूश आहे. काही वर्षांपूर्वी मी लग्न केले. माझे पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये व्हॉईस प्रेसिडेंट आहेत. मी कधी लग्न करेन असे देखील मला वाटले नव्हते. पण मी लग्न करावे असे माझ्या घरातल्यांना वाटत होते. त्यामुळे मी अरेंज्ड मॅरेज केले. माझ्या पतींचे देखील हे दुसरे लग्न आहे. त्यांना एक पंधरा वर्षांचा मुलगा असून त्या मुलासोबत माझे नाते एखाद्या मैत्रिणीसारखे आहे. तो मला नावानेच हाक मारतो. माझ्या सासरची मंडळी देखील करियरमध्ये मला खूप सपोर्ट करतात.
![megha dhade]()
Also Read : बिग बॉस मराठीतील या स्पर्धकाला मिळते सगळ्यात जास्त मानधन
Also Read : बिग बॉस मराठीतील या स्पर्धकाला मिळते सगळ्यात जास्त मानधन