Bigg Boss11:केवळ सलमान खानमुळे ऐनवेळी घेण्यात आला हा निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 10:05 AM2018-01-15T10:05:10+5:302018-01-15T15:36:23+5:30
बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमधील वाद,शोमधील अश्लीलता यामुळे बिग बॉसची चर्चा नेहमीच जोरात रंगते.बिग बॉस या शोमध्ये सहभागी होणा-या स्पर्धकांची ...
ब ग बॉसच्या घरातील स्पर्धकांमधील वाद,शोमधील अश्लीलता यामुळे बिग बॉसची चर्चा नेहमीच जोरात रंगते.बिग बॉस या शोमध्ये सहभागी होणा-या स्पर्धकांची चर्चा कायमच रंगल्याचे पाहायला मिळते.शो संपल्यानंतर या घरातील स्पर्धकांची लोकप्रियता कमी होत नाही.असं असलं तरी बिग बॉसचं विजेतेपद पटकावण्यासाठी प्रत्येकजण खटाटोप करत असतो.बिग बॉसची ट्रॉफी आणि पुरस्काराची रक्कम जिंकण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं.असाच प्रयत्न यंदाच्या 'बिग बॉस 11' पर्वातही स्पर्धकांनी केला. यंदाच्या सिझनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपापल्या परीने या शोचा विनर बनण्याचा प्रयत्न केला.शेवटी कोणी एकच विजेता होणार होता. बिग बॉसच्या विनरसाठी शिल्पा शिंदेचेच नाव आघाडीवर होते.सूत्रांनुसार सुरुवातीलाच चॅनलने हिना खानला सांगितले होते की, तिच शोची विनर बनेल. कारण शिल्पा शिंदेची निगेटिव्ह इमेज पाहता तिचे शो जिंकण्याचे चान्स खूप कमी होते असे चॅनलला वाटले होते.मात्र हिच गोष्ट जेव्हा सलमानला कळाली तेव्हा त्याने लाइव्ह वोटिंग द्वारे विनर निवडण्याचे ठरवले.अगदी त्याचप्रमाणे लाईव्ह वोटिंग घेण्यात आली.वोटिंगनुसार अखेर शिल्पा शिंदेच या सिझनची विजेती बनली. त्यामुळे हिना पेक्षा शिल्पाच सरस असल्याचे या लाईव्ह वोटींगद्वारे स्पष्ठ झाले.मुळात जेव्हा शिल्पा शिंदेने घरात एंट्री केली होती.तेव्हा तिची इमेज खूप निगेटीव्ह वाटत होती.मात्र शिल्पाने घरात एक सेलिब्रेटी म्हणून नाही तर शिल्पा शिंदे म्हणून तिने आपली एक ओळख जगाला पटवून दिली.वेळोवेळी तिचा मराठीबाणाही रसिकांनी अनुभवला.शिल्पा शिंदेने मिळालेल्या संधीचे सोने करत पाचवी महिला विजेती होण्याचा मान मिळवला.
Also Read:Bigg Boss 11 Winner:असा होता शिल्पा शिंदेचा 'बिग बॉस'च्या घरातला प्रवास,जाणून घेण्यासाठी क्लिक करा!
शिल्पाच्या नावाने काही दिवसांपूर्वी वुई लव्ह शिल्पा शिंदे असा हॅशटॅग तिच्या चाहत्यांनी तयार केला होता.या हॅशटॅगचा वापर करत तिच्या फॅन्सने तिला अनेक ट्वीट केले होते. तिच्या फॅन्सने केलेल्या ट्वीटची संख्या एक दक्षलक्षाहून देखील जास्त होती आणि त्यामुळेच वुई लव्ह शिल्पा शिंदे हा हॅशटॅग ट्विटरच्या ट्रेंडिंग मध्ये देखील आला होता.कोणताही टिव्ही कलाकार इतक्या ट्वीटमुळे ट्रेंडिंग मध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्याचमुळे शिल्पा शिंदेने सोशल मीडियावर एक रेकॉर्ड रचला होता.