Bigg Boss 12 : माझ्यात आणि जसलीनमध्ये तसले काहीही नाही; तो फक्त प्लान; अनुप जलोटा यांचा मोठ्ठा खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 09:17 AM2018-10-29T09:17:54+5:302018-10-29T09:18:26+5:30
सुप्रसिद्ध भजनगायक अनुप जलोटा काल ‘बिग बॉस 12’च्या घरातून बाहेर पडले. जसलीनसोबतच्या नात्यावर अनुप काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर अनुप यांनी खुलासा केलाच.
सुप्रसिद्ध भजनगायक अनुप जलोटा काल ‘बिग बॉस 12’च्या घरातून बाहेर पडले. अनुप जलोटांनी त्यांची शिष्या जसलीन मथारूसोबत ‘बिग बॉस 12’च्या घरात प्रवेश घेतला होता. हा प्रवेश घेताना आम्ही दोघेही तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत, हे नॅशनल टीव्हीवर सांगून अनुप व जसलीन यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे अनुप जलोटा ‘बिग बॉस 12’च्या घरातून बाहेर येताच सगळ्यांचे कान टवकारले होते. जसलीनसोबतच्या नात्यावर अनुप काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर अनुप यांनी खुलासा केलाच. होय, जसलीन मथारू माझी गर्लफ्रेन्ड नाही. ती फक्त माझी शिष्या आहे आणि मी तिचा गुरू आहे. मी तिला संगीत शिकवतो. आमच्यामध्ये गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्डचे कुठलेही नाते नाही. ना आम्ही आजपर्यंत कुठल्या रोमॅन्टिक नात्यात होतो, ना आमच्यात शारीरीक संबंध होते, असे अनुप यांनी सांगितले. बिग बॉस शो स्क्रिप्टेड असतो़ जसलीनसोबतचे माझे नाते बिग बॉसने प्लान केले होते, असा दावाही त्यांनी केला. गुरू-शिष्य बनून आलात तर शो चालणार नाही, हे मला पटवून देण्यात आले. त्यामुळे गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड बनून आम्ही घरात गेलोत. घरातील आम्ही दोघांतील वाद, भांडण, नाराजी सगळे काही बिग बॉसने सांगितल्याप्रमाणे होते, असा खुलासाही त्यांनी केला.
जसलीनचे वडील माझे चांगले मित्र असल्याचा दावाही त्यांनी केला. मी जसलीन व तिच्या कुटुंबाला दीर्घकाळापासून ओळखतो़ आम्ही अनेकदा भेटतो, असेही अनुप जलोटा म्हणाले.
लोकांमध्ये लोकप्रीय असूनही अनुप जलोटा ‘बिग बॉस 12’मध्ये फार काळ टिकू शकले नाहीत. याचे कारणही त्यांनी सांगितले. विनाकारण भांडणे उखरून काढणे मला जमले नाही. मी माझ्या दीर्घ करिअरमध्ये बरीच प्रतिष्ठा कमावली आहे. वाद-भांडणे मला शोभत नाहीत. ना मी कुणाला शिव्या देऊ शकत, ना कुणाच्या शिव्या खाऊ शकत. कदाचित याचमुळे मी लवकर बाहेर पडलो. पण ‘बिग बॉस 12’मधील प्रत्येक दिवस यादगार आहे, असे अनुप जलोटा म्हणाले.
एकंदर काय तर अनुप जलोटा यांच्या या खुलाशानंतर त्यांचे व जसलीनचे नाते केवळ ‘बिग बॉस 12’च्या घरात 'सणसणी' निर्माण करण्यासाठीचं होते, एवढेच दिसतेय.