बिन कुछ कहे फेम समीर अरोराला मिळाले सरप्राइज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2017 12:01 PM2017-05-03T12:01:03+5:302017-05-03T17:31:03+5:30
बिन कुछ कहे या मालिकेची सध्या चांगलीच चर्चा आहे. या मालिकेचे चित्रीकरण जयपूरमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होते. आता ...
ब न कुछ कहे या मालिकेची सध्या चांगलीच चर्चा आहे. या मालिकेचे चित्रीकरण जयपूरमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होते. आता या मालिकेचे चित्रीकरण संपवून सगळे कलाकार नुकतेच त्यांच्या घरी परतले आहेत. गेल्या कित्येक महिन्यापासून हे सगळे मालिकेचे चित्रीकरण करत असल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रमैत्रिणींना भेटायला वेळच मिळाला नव्हता. त्यामुळे ते आपल्या कुटुंबियांना आणि मित्रमैत्रिणींना भेटण्यास खूप उत्सुक होते. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे शमिता आंचन, निखिल सबरवाल आणि समीर अरोरा यांनी आपल्या घरातील लोकांना सरप्राइज देण्याचे ठरवले आणि त्यांनी घरी परतत असल्याचे घरातल्यांना न कळवता सगळे आपापल्या घरी अचानक गेले. पण घरी गेल्यावर समीर अरोरालाच खूप चांगले सरप्राइज मिळाले.
शोमध्ये तो कबीर मिरांडा ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेचा लूक हा खूप वेगळा आहे. या भूमिकेसाठी त्याने दाढी ठेवली आहे. पण चित्रीकरण संपल्या संपल्या त्याने लगेचच दाढी काढली आहे. खरे तर त्याला त्या दाढीत प्रचंड गरम होत असे. पण मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्याला दाढी वाढवण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे चित्रीकरण संपल्यावर लगेचच त्याने शेव्हिंग केली.
मालिकेचे चित्रीकरण संपल्यावर घरी निघायच्याआधी त्याने या मालिकेचे निर्माते आणि सहकलाकार यांना भेटायचे ठरवले आणि त्यासाठी तो त्यांचा निरोप घ्यायला गेला तर त्यांनी त्याला ओळखलेच नाही. एवढेच नव्हे तर तो त्याच्या घरी नैनितालला गेला, त्यावेळीदेखील त्याच्या घरातल्यांनी त्याला ओळखलेच नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून सगळ्यांना त्याला क्लीन शेव्हमध्ये पाहायची सवय झाली होती. त्यामुळे त्याला या नवीन लूकमध्ये ओळखणे सगळ्यांना कठीण झाले होते.