​बिन कुछ कहे या मालिकेच्या टीमने दिली अजमेर शरीफला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 09:27 AM2017-02-16T09:27:16+5:302017-02-16T14:57:16+5:30

बिन कुछ कहे या मालिकेत शमता आंचन प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या मालिकेद्वारे दोन वर्षांनंतर शमताने छोट्या पडद्यावर पुनरागमन ...

Bin said something to the team from Ajmer Sharif visited | ​बिन कुछ कहे या मालिकेच्या टीमने दिली अजमेर शरीफला भेट

​बिन कुछ कहे या मालिकेच्या टीमने दिली अजमेर शरीफला भेट

googlenewsNext
न कुछ कहे या मालिकेत शमता आंचन प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या मालिकेद्वारे दोन वर्षांनंतर शमताने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शमताने एव्हरेस्ट या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेत समीर अरोरा तिच्यासोबत झळकत आहे. त्याची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेचे सध्या चित्रीकरण जयपूर येथे सुरू आहे. मालिकेच्या चित्रीकरणातून वेळ काढून समीर आणि शमता जयपूरमधील विविध ठिकाणांना भेटी देत आहेत. नुकतेच ते तिथे रिक्षानेदेखील फिरले. तसेच जयपूरच्या प्रसिद्ध बाजारात त्यांनी शॉपिंगदेखील केली. अजूनही जयपूरमधील विविध ठिकाणे फिरण्याची त्यांची इच्छा असल्याचे शमता सांगते. 
शमता आणि आंचनने नुकतीच अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली. त्यानंतर ते दोघे पुष्करलादेखील गेले. या प्रवासात त्यांनी खूप मजा मस्ती केली. याविषयी शमता सांगते, "माझ्यासाठी आणि समीरसाठी हा खूपच चांगला अनुभव होता. मी तर तिथे पहिल्यांदाच गेले होते." तर या मालिकेत कबीरची भूमिका साकारणारा समीर सांगतो, "ही जागा एखाद्या स्वर्गाप्रमाणे असल्याचे मी नेहमी ऐकले होते आणि या ठिकाणाला भेट देऊन मी या गोष्टीचा अनुभव घेतला. अजमेर शरीफला गेल्यानंतर आम्ही पुष्करमधील ब्रम्ह मंदिरातदेखील गेलो. आम्ही आमच्या मालिकेच्या यशासाठी अजमेर शरीफच्या दर्ग्यावर चादरदेखील चढवली."  
बिन कुछ कहे या मालिकेत एका पंजाबी कुटुंबाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या तिन्ही मुलींचा सांभाळ एक स्त्री करते. या तिन्ही मुलींचा स्वभाव खूपच वेगळा आहे. पण या तिघींकडून त्यांच्या आईला खूप अपेक्षा आहेत. त्यातील सर्वात लहान मुलगी मायरा ही सगळ्यांची खूप लाडकी आहे. खऱ्या प्रेमाचा शोध घेत असलेल्या मायराची कथा या मालिकेत दाखवली जाणार आहे. 

Web Title: Bin said something to the team from Ajmer Sharif visited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.