बिपाशा-करण म्हणणार 'भाभीजी घर पर है'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2016 05:54 PM2016-10-18T17:54:56+5:302016-10-21T11:12:36+5:30

'भाभीजी घर पर है' या मालिकेत नुकतीच सनी लिओनीने हजेरी लावली. तिच्या पाठोपाठ आता बिपाशा बासू, तिचा पती करणसिंग ...

Bipasha-Karan will say 'Bhabhiji is at home' | बिपाशा-करण म्हणणार 'भाभीजी घर पर है'

बिपाशा-करण म्हणणार 'भाभीजी घर पर है'

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">'भाभीजी घर पर है' या मालिकेत नुकतीच सनी लिओनीने हजेरी लावली. तिच्या पाठोपाठ आता बिपाशा बासू, तिचा पती करणसिंग ग्रोवरसह या मालिकेत एंट्री मारणार आहे. या मालिकेत बिपाशाला येण्यासाठी विचारण्यात आले तेव्हा ती खूपच खूष झाली, कारण तिच्या आई-वडिलांची ही आवडती मालिका असल्याचे बिपाशाने म्हटले आहे. मालिकेला रसिकांसोबत बॉलिवूड सेलिब्रेटींचेही प्रेम मिळते आहे. त्यामुळे खूपच आनंद होतो. मी बिपाशा- करण सोबत कधीच काम केले नव्हते. या मालिकेच्या निमित्ताने बिपाशासह काम करण्याची संधीही मिळणार असल्यामुळे खूप आनंदी असल्याचे ‘अंगुरी भाभी’ फेम शुभांगी अत्रे हिने सांगितले. करण सिंहने त्याच्या करिअरची सुरूवातही छोट्या पडद्यावरच केली होती. त्यामुळे बिपाशासह करण सिंहला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहणे रसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. 

Web Title: Bipasha-Karan will say 'Bhabhiji is at home'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.