‘गोकुलधाम’चे एकमेव सेक्रेटरी! शेजाऱ्यांनाही ठाऊक नाही भिडे मास्तरांचं खरं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 17:08 IST2021-07-27T17:07:12+5:302021-07-27T17:08:42+5:30
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील गोकुलधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आत्मारात तुकाराम भिडे अर्थात भिडे मास्तरांचा वाढदिवस.

‘गोकुलधाम’चे एकमेव सेक्रेटरी! शेजाऱ्यांनाही ठाऊक नाही भिडे मास्तरांचं खरं नाव
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतील गोकुलधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आत्मारात तुकाराम भिडे अर्थात भिडे (Bhide) मास्तरांबद्दल कोणालाही नव्यानं सांगण्याची गरज नाही. टेलिव्हिजन विश्वातील हा एक लोकप्रिय चेहरा. पण त्यांना खरी लोकप्रियता दिली ती ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेने. अभिनेते मंदार चांदवडकर (mandar chandwadkar) यांनी ही भूमिका साकारली आहे. आज त्यांचा वाढदिवस.
मंदार हे गेल्या 12 वर्षांपासून ही मालिका करत आहेत. या शोमध्ये त्यांची एन्ट्री झाली आणि आता काय तर भिडे मास्तरांशिवाय या मालिकेची कल्पनाही प्रेक्षक करू शकणार नाहीत.
फार कमी लोकांना ठाऊक असेल की मंदार चांदवडकर हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. मंदार चांदवडकर आधी दुबईमध्ये मेकॅनिकल इंजिनियर नोकरीला होते. 2000 साली त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी नाटक आणि मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आठ वर्ष मराठी नाटकांमध्ये काम केल्यानंतर आत्माराम भिडे ही व्यक्तिरेखा त्यांना मिळाली.
मंदार आज भिडे मास्तर याच नावाने ओळखले जातात. अगदी त्यांचे शेजारीही त्यांना याच नावाने ओळखतात. शेजाऱ्यांना त्यांचे खरे नाव अद्यापही ठाऊक नाही. भिडे मास्तरांची भूमिका हीच त्यांची ओळख बनली आहे.
आश्चर्य वाटेल पण त्यांच्या घरचे वीजेचे बिलही भिडे मास्तर याच नावाने येते. फार कमी लोक त्यांना मंदार या नावाने हाक मारतात.
मंदार चांदवडकर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या प्रत्येक एपिसोडसाठी किती रूपये घेतात माहितीये? तर 45 हजार रूपये. मालिकेत भिडे मास्तरांची अगदी सामान्य व्यक्तिची भूमिका साकारली आहे. पण रिअल लाईफमध्ये मंदार कोट्यवधी रूपयांचे मालक आहेत. त्यांच्याकडे 20 कोटी रूपयांची संपत्ती आहे. मंदार यांना महागड्या गाड्यांची आवड आहे.
मंदार यांच्याा पत्नीचे नाव स्नेहल चांदवडकर आहे. सौंदर्याच्या बाबतीतही ‘माधवी भाभी’पेक्षा मागे नाहीये. स्नेहल ही मध्य प्रदेशातील इंदूर येथील आहे. मंदार चांदवडकर आणि स्नेहल चांदवडकर हे एका मुलाचे आई-वडील आहेत. त्यांच्या गोंडस मुलाचे नाव पार्थ आहे.