'सावली होईन सुखाची'मधील बिट्टीने असा लुटला उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 06:09 PM2024-06-04T18:09:37+5:302024-06-04T18:09:58+5:30

Aarambhi Ubale : 'सावली होईन सुखाची' या नव्या मालिकेतील बालकलाकार आरंभी उबाळे उर्फ बिट्टीने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केलेली आहे.

Bitti in 'Saavali Hoin Sukhachi' enjoyed the summer vacation like this | 'सावली होईन सुखाची'मधील बिट्टीने असा लुटला उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद

'सावली होईन सुखाची'मधील बिट्टीने असा लुटला उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद

बालकलाकार हे नेहमी आपल्या निरागस ॲक्टिंग ने प्रेक्षकांवर भुरळ घालत असतात. सन मराठी वाहिनीवरील 'सावली होईन सुखाची' या नव्या मालिकेतील बालकलाकार आरंभी उबाळे उर्फ बिट्टीने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केलेली आहे. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे लहान मुलांसाठी आनंददायी काळ, मे महिन्याची सुट्टी म्हटल की लहान मुले अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. मे महिन्याचा सुट्टीत आपण पाहतो कोणी विविध उपक्रमांत सहभाग घेतात आणि नवीन गोष्टी शिकतात. या काळात अनेक जण आपल्या आजी-आजोबांकडे किंवा गावाला जातात. तिथे ते खेळ, स्वयंपाक, शेतीचे काम, आणि पारंपरिक कलेचे धडे घेतात. यंदाचा उन्हाळ्यात आरंभी उबाळे ही छोटी गोडुली घेतेय समर वॅकेशनचा पुरेपूर आनंद.

बिट्टीने म्हणजेच सावली होईन सुखाची या सन मराठीवरील बालकलाकार आरंभी उबाळे हिने एका अनोख्या अंदाजात मे महिन्याचा सुट्टीचा आनंद लुटला आहे. आरंभींने आपल्या छोट्याशा हाताची कमाल करत बनवलेत क्यूट असे क्राफ्ट्स. आरंभीला लहानपणापासूनच क्राफ्ट्स बनवण्याची आवड असल्यामुळे तिचा इवल्याशा हातांनी तिने अगदी सुंदर असे पिंकिश थीममध्ये  छोटे कागदाचे कप, बॅग,बॉक्सेस अशा गोष्टी बनवल्या आहेत. त्यामुळे खरचं बिट्टी ने जादू केलीय असे म्हणायला हरकत नाही. 


बीट्टीने उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेत खरंच आपल्याला दाखवून दिले आहे की वेगळ्या अंदाजाने देखील आपण उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करू शकतो. त्यामुळे आरंभी लहान मुलांसाठी नक्कीच एक प्रेरणा ठरू शकते. 'सावली होईन सुखाची' सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त आपल्या सन मराठीवर पाहता येईल.

Web Title: Bitti in 'Saavali Hoin Sukhachi' enjoyed the summer vacation like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.