पलक जैन 15 मिनिटांत होते शूटसाठी तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 07:34 AM2018-04-05T07:34:10+5:302018-04-05T13:04:10+5:30
‘ये प्यार नहीं तो क्या है’ मालिकेत अनुष्का रेड्डीची भूमिका करत असलेली पलक जैन एक गडगंज श्रीमंत आणि शालीन ...
‘ े प्यार नहीं तो क्या है’ मालिकेत अनुष्का रेड्डीची भूमिका करत असलेली पलक जैन एक गडगंज श्रीमंत आणि शालीन मुलगी दाखवली आहे. या मालिकेतील तिच्या सुसंस्कृत आणि तरीही साध्या लुकचे खूप कौतुक होत आहे. ये प्यार नहीं तो क्या है मालिकेतून पदार्पण करत असलेली पलक सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स देण्यासाठी आणि आपला ठसा उमटविण्यासाठी सर्व संभव प्रयत्न करत आहे. याचे एक उदाहरण म्हणजे या व्यक्तिरेखेचा लुक धारण करण्यासाठी तिला लागणारा कमीत कमी वेळ. सामान्यपणे सर्व अभिनेत्री भरपूर मेक-अप, वेषभूषा, आभूषणे लेवून व्यक्तिरेखेचा लुक साकार करण्यासाठी नेहमी खूप वेळ घेत असतात. परंतु अनुष्काची व्यक्तिरेखा एका सभ्य आणि अभिजात स्त्रीची असल्यामुळे तिला कमीत कमी मेकअप आणि अॅक्सेसरीज घालायच्या आहेत, त्यामुळे तिला तयार व्हायला फक्त 15 मिनिटे लागतात! पुरुष कलाकारांना देखील तिच्यापेक्षा जास्त वेळ लागतो याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते आणि प्रॉडक्शन टीमला आनंद! पलकचा लुक तिच्या अनुष्का रेड्डी या एका कुशल उद्योजिकेच्या भूमिकेसाठी अगदी साजेसा आहे.
अनुष्काला (पलक जैन) याचे रहस्य विचारले असता, ती हेच म्हणाली, “चित्रीकरणासाठी तयार व्हायला मला 15 मिनिटेच लागतात हे खरे आहे. ‘साधेपणातच अभिजातता असते’ यावर माझा दृढ विश्वास आहे. फारसा मेकअप किंवा अॅक्सेसरीज न वापरताही तुम्ही आकर्षक आणि शालीन दिसू शकता. असेही, अनुष्का रेड्डीची व्यक्तिरेखा एका आत्मविश्वासाने भरलेल्या व आपले ध्येय माहीत असलेल्या व्यक्तीची असल्याने तिच्या वेशभूषेत फापटपसारा नाही, जे माझ्या पथ्यावरच पडले आहे आणि शिवाय तयार होण्यातला वेळ देखील वाचतो. मी प्रत्यक्षात अगदी तिच्यासारखीच आहे त्यामुळे आमच्यात खूप गोष्टींत साम्य दिसू शकते आणि म्हणूनच ही व्यक्तिरेखा मला लगेच आपलीशी झाली. आम्ही दोघी हाती घेतलेल्या कामावर लक्ष केन्द्रित करतो आणि त्यात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही आव्हानाला हिंमतीने तोंड देतो.”