ब्लू प्लॅनेट २ च्या भारतातील पहिल्याच ब्लू कार्पेट प्रिमीयरला मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 07:08 AM2018-05-17T07:08:30+5:302018-05-17T12:38:30+5:30

सोनी बीबीसी अर्थ या भारतातील पहिल्या वास्तववादी मनोरंजनात्मक वाहिनीने मुंबईत आयोजित केलेल्या ब्लू प्लॅनेट 2 च्या ब्लू कार्पेट प्रिमीयर ...

Blue Planet 2's India's first Blue Carpet Premiere is a crowd of entertainers in the entertainment sector | ब्लू प्लॅनेट २ च्या भारतातील पहिल्याच ब्लू कार्पेट प्रिमीयरला मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांची गर्दी

ब्लू प्लॅनेट २ च्या भारतातील पहिल्याच ब्लू कार्पेट प्रिमीयरला मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांची गर्दी

googlenewsNext
नी बीबीसी अर्थ या भारतातील पहिल्या वास्तववादी मनोरंजनात्मक वाहिनीने मुंबईत आयोजित केलेल्या ब्लू प्लॅनेट 2 च्या ब्लू कार्पेट प्रिमीयर सोहळ्याला टीव्ही, समाजमाध्यम आणि चित्रपटसृष्टीतील बहुसंख्य मंडळी उपस्थित होती आणि यावेळी लाईट्स, कॅमेरा यानंतर अॅक्शनचा जबरदस्त आस्वाद उपस्थितांना लुटता आला. १८ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झालेला हा शो २२ शहरांतील पीव्हीआर सिनेमांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या प्रिमीयर सोहळ्याला अर्जून रामपाल, सोनू निगम, दिया मिर्झा, कोंकणा सेन शर्मा, कल्की कोचलीन, सोहा अली खान, आर.बाल्की, सोनाली बेंद्रे, सुमीत व्यास, राकेश ओम प्रकाश मेहरा, झायेद खान, राहुल बोस, भारती सिंग, करण सिंग ग्रोव्हर, ऋत्विक धनजानी, आशा नेगी, मिनी माथूर, तारा शर्मा, रिधी डोगरा, कानन गिल आणि मल्लिका दुवा आदी कलाकार उपस्थित होते. त्यांनी पृथ्वीवरील महासागरांप्रती आपले प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या समुद्रांतर्गत सफरीची मजा आपल्या सेलिब्रिटी पालकांसोबत आलेल्या सर्व बालकलाकारांनी लुटली. मासे, कासव, डॉल्फिन्स यांना पाहण्याचा अद्वितीय आनंद मुलांना अनुभवता आला.
समुद्राच्या पाण्याखालचे जग प्रेक्षकांना दाखवून एक नवा, अद्भूत अनुभव देणारी ब्लू प्लॅनेट 2 ही सुंदर कथा आहे. ३९ देशांत १२५ प्रवासी मोहिमा आखून तब्बल चार वर्षं या कथेचे चित्रीकरण करण्यात आले असून ब्लू प्लॅनेट 2 ही कथा निसर्ग इतिहासाचे जनक सर डेव्हिड अटेनबरो यांनी कथन केली आहे. याला जगप्रसिद्ध संगीतकार हान्स झिमर यांनी संगीत दिले आहे. श्वास रोखायला लावतील अशा भव्य दृश्यांसह यंदाच्या उन्हाळ्यात या कथेचा आस्वाद सर्वांनी घ्यायलाच हवा.
ताज्या बीएआरसी आकडेवारीनुसार सोनी बीबीसी अर्थ ही वास्तववादी माहितीवर आधारित मनोरंजन वाहिनी स्थापनेच्या एका वर्षाच्या आतच मेट्रोमधील नंबर १ ची वाहिनी ठरली आहे. त्यामुळे सोनी बीबीसी अर्थ ही इन्फोटेनमेंट श्रेणीमधील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी वाहिनी ठरली आहे. एक वर्षापूर्वीच सुरू झालेली ही वाहिनी ६ व्या क्रमांकावर असताना, त्याच्या प्रेक्षकांमध्ये होत असलेली स्थिर वाढ वाहिनीच्या कामगिरीमध्ये स्पष्ट दिसते.

Also Read : ​सॅनिटरी नॅपकीनच्या वापराबद्दल दिया मिर्झाने केला मोठा खुलासा!

Web Title: Blue Planet 2's India's first Blue Carpet Premiere is a crowd of entertainers in the entertainment sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.