'बिग बॉस'नंतर शिल्पा शिरोडकरला लागली लॉटरी; लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:04 IST2025-02-17T11:59:47+5:302025-02-17T12:04:10+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

bollywood actress shilpa shirodkar announced her new film share screen with telugu actor sudheer babu post viral | 'बिग बॉस'नंतर शिल्पा शिरोडकरला लागली लॉटरी; लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर

'बिग बॉस'नंतर शिल्पा शिरोडकरला लागली लॉटरी; लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर

Shilpa Shirodkar:बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सेन्सेशनल क्वीन म्हणून ओळखळी जाणारी ही अभिनेत्री अलिकडेच 'बिग बॉस'च्या १८ व्या सीजनमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे ती प्रचंड चर्तेत आली होती. शिल्पा शिरोडकर आपल्या उत्तम खेळीने १०२ दिवस या घरात होती. मात्र, खेळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात अभिनेत्रीला घराबाहेर जावे लागलं. त्यामुळे तिचे चाहते सुद्धा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं.परंतु 'बिग बॉस'नंतर अभिनेत्रीला एका बिग बजेट चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. आता जवळपास २५ वर्षानंतर अभिनेत्री मोठ्या पडद्यावर कमबॅक करते आहे. 


अभिनयातून बराच काळ ब्रेक घेतल्यानंतर शिल्पा शिरोडकरने १३ वर्षांनंतर टीव्ही शो 'एक मुठ्ठी आसमान से'मधून पुनरागमन केलं होतं. मात्र, ती चित्रपटांपासून दूर होती. त्यानंतर आता अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. नुकतीच  शिल्पा शिरोडकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केलं आहे. 'जटाधारा' असं या चित्रपटाचं नाव असून तेलुगू अभिनेता सुधीर बाबूसोबत ती या चित्रपटात स्क्रीन शेअर करण्यार आहे. अभिनेता सुधीर बाबूने याआधी 'बाघी' या बॉलिवूडसिनेमात खलनायकाची भूमिका साकारली होती.

याबाबत आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्टर शेअर करत शिल्पा शिरोडकरने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "नवीन सुरुवात. मी माझ्या नवीन प्रोजेक्ट जटाधारा, ज्याची कथा व्यंकट कल्याण यांनी लिहिली आहे, त्याची घोषणा करताना मी खूप उत्सुक आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शन धुरा देखील त्यांच्या खांद्यावर आहे. हा चित्रपट झी स्टुडिओच्या बॅनरखाली बनवला जात आहे." अशी माहिती तिने या पोस्टद्वारे चाहत्यांना दिली आहे.  

शिल्पा शिरोडकरच्या करिअरविषयी सांगायचं तर तिने 'आँखे', 'गोपी किशन', 'खुदा गवाह', 'हम'  यासारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने 'एक मुठ्ठी आसमान' या मालिकेतही भूमिका साकारली आहे. अमिताभ बच्चन, मिथून चक्रवर्ती ते शाहरुख खान अशा सर्वच अभिनेत्यांसोबत शिल्पा शिरोडकर अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत . शिल्पा ही नम्रता शिरोडकर हिची मोठी बहीण आणि साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांची मेव्हणी आहे.

Web Title: bollywood actress shilpa shirodkar announced her new film share screen with telugu actor sudheer babu post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.