Bigg Boss OTT: 'तुझा नवरा, सासू...घरच्या गोष्टी घरी ठेव '; सहानभुती मिळवणाऱ्या आलियाला सलमानचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 04:28 PM2023-06-25T16:28:12+5:302023-06-25T16:28:55+5:30

Bigg Boss OTT: शनिवारी रंगलेल्या वीकेंड का वॉरमध्ये सलमानने फायरल मोडमध्ये स्पर्धकांना खडे बोल सुनावले. इतकंच नाही तर नवाजुद्दीनची पत्नी आलिया हिलादेखील चांगलं फटकारलं आहे.

bollywood bigg boss ott 2 salman khan bashes out on nawazuddin siddiqui ex wife aaliya siddiqui for talking about her personal life | Bigg Boss OTT: 'तुझा नवरा, सासू...घरच्या गोष्टी घरी ठेव '; सहानभुती मिळवणाऱ्या आलियाला सलमानचा दणका

Bigg Boss OTT: 'तुझा नवरा, सासू...घरच्या गोष्टी घरी ठेव '; सहानभुती मिळवणाऱ्या आलियाला सलमानचा दणका

googlenewsNext

प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT). नुकतंच या शोचं दुसरं पर्व सुरु झालं आहे. विशेष म्हणजे हे पर्व सुरु झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात घरातील स्पर्धकांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे या शोच्या पहिल्याच भागात सलमानने स्पर्धकांची शाळा घेतली आहे. शनिवारी रंगलेल्या वीकेंड का वॉरमध्ये सलमानने फायरल मोडमध्ये स्पर्धकांना खडे बोल सुनावले. इतकंच नाही तर नवाजुद्दीनची पत्नी आलिया हिलादेखील चांगलं फटकारलं आहे. सोबतच तुझ्या घरचे वाद घरीच ठेव, असा सल्लाही दिला.

शनिवारी झालेल्या विकेंड का वॉरमध्ये सलमानने आकांक्षा पुरीला फटकारलं. यावर मी केवळ आलियाशीच बोलते असं सांगितलं. आकांक्षाचं हे वाक्य ऐकल्यानंतर सलमानने तिला मध्येच थांबवत तुम्ही वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींवर चर्चा का करता? असा प्रश्न विचारला. सोबतच त्याने त्याचं टीकेची तोफ आलियाकडे वळवली. आलियाच्या वैयक्तिक आयुष्यात आम्हा कोणालाच रस नाहीये. तिने तिचं सासू-सुनेचं नाटक घरीच ठेवावं. बिग बॉसच्या घरात त्याची चर्चा करु नये, असा सल्ला दिला.
 

नेमकं आलियाला काय म्हणाला सलमान?

"आलिया नीट ऐक, आम्हाला तुझ्या वैयक्तिक आयुष्यात कसलाही रस नाही. तुझ्या नवऱ्याचं, सासूचं आणि घरातल्या अन्य नातेवाईकांचं काय झाले हे जाणून घेण्यात आम्हाला रस नाही. या शोमध्ये तुला तुझ्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धी मिळत असेल असं तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. तू तुझ्यातलं टॅलेंट दाखव जेणेकरुन लोक तुझ्यातलं कौशल्य पाहतील, ऐकतील. त्यामुळे असे पुन्हा घडू देऊ नका", असं सलमान म्हणाला.

दरम्यान, सलमानने फटकारल्यानंतर मी ही गोष्ट फक्त अभिषेकलाच सांगितली, असं आलियाने सांगितलं. तसंच आलियाने या घरात एन्ट्री केली त्यावेळीही प्रोमोमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं होतं. या घरात आल्यापासून तिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबतच्या वादाविषयी अनेक खुलासे केले आहेत.
 

Web Title: bollywood bigg boss ott 2 salman khan bashes out on nawazuddin siddiqui ex wife aaliya siddiqui for talking about her personal life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.