'निष्फळ चर्चा होती' म्हणत निया शर्माने दिलेला कंगनाच्या 'मणिकर्णिका'ला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 17:40 IST2021-09-23T17:40:00+5:302021-09-23T17:40:00+5:30
Nia sharma: 'या चित्रपटात मला भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र, मी नकार दिला', असं नियाने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

'निष्फळ चर्चा होती' म्हणत निया शर्माने दिलेला कंगनाच्या 'मणिकर्णिका'ला नकार
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा सतत या ना त्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. त्यातच आता ती बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. 'या चित्रपटात मला भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र, मी नकार दिला', असं नियाने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
अलिकडेच नियाने प्रसिद्ध आरजे सिद्धार्थ कन्नला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने मणिकर्णिकाला नकार का दिला यामागचं कारण सांगितलं आहे. 'छोट्या पडद्यावरील कलाकारांना कायम दुय्यम स्थान दिलं जातं हे मला माहितीये. त्यामुळे मला कोणत्याच चित्रपट निर्माता किंवा दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये जायचं नव्हतं', असं तिने सांगितलं.
११ वर्षांनी लहान असणाऱ्या डान्सरला स्नेहा करत होती डेट?
"मणिकर्णिकाच्या निमित्ताने मी एका मिटींगमध्ये सहभागी झाले होते. ती मिटींग मला चित्रपटात एक लहानसा रोल देण्यासाठी होती. काही अर्थ नव्हता त्या मिटींगमध्ये निष्फळ चर्चा होती. त्यानंतर मी परत तिथे पाऊल ठेवलं नाही. काही फायदा नव्हता त्या चर्चेचा उगाच वेळ खर्ची गेला", असं निया म्हणाली.
दरम्यान, कंगनाचा मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी हा चित्रपट २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला.या चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौतने राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली होती. कंगनासोबतच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडेदेखील या चित्रपटात झळकली होती.