तुला इतकं उत्तम मराठी कसं येतं? ‘Chala Hawa Yeu Dya’च्या सेटवर अक्षय कुमारनं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 03:01 PM2021-10-31T15:01:49+5:302021-10-31T15:05:07+5:30

‘Chala Hawa Yeu Dya’च्या मंचावर अवतरणार अक्षय कुमार, पाहायला मिळणार खिलाडीचा मराठमोळा अंदाज

Bollywood superstar Akshay Kumar to grace Chala Hawa Yeu Dya's Diwali special episode | तुला इतकं उत्तम मराठी कसं येतं? ‘Chala Hawa Yeu Dya’च्या सेटवर अक्षय कुमारनं दिलं उत्तर

तुला इतकं उत्तम मराठी कसं येतं? ‘Chala Hawa Yeu Dya’च्या सेटवर अक्षय कुमारनं दिलं उत्तर

googlenewsNext

अक्षय कुमारच्या (Akshay Kumar ) ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय लवकरच ‘थुकरटवाडी’त येणार आहे. होय, ‘चला हवा येऊ द्या’च्या 1, 2 आणि 3  नोव्हेंबरला अक्षय आणि थुकरटवाडीच्या विनोदवीरांची धम्माल मस्ती पाहायला मिळणार आहे. इतकंच नाही तर यावेळी अक्कीचा मराठमोळा अंदाजही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शिवाय अक्षयला इतकं उत्तम मराठी कसं येतं? या प्रश्नाचं उत्तरही प्रेक्षकांना मिळणार आहे.
होय, ‘चला हवा येऊ द्या’चा  (Chala Hawa Yeu Dya) सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable) यांनी अक्षयला मराठीत अनेक प्रश्न विचारले आणि अक्षयनेही मराठी भाषेत त्याची झक्कास उत्तरं दिलीत. साहजिकच तुम्ही इतकं चांगलं मराठी कसं काय बोलता? असा प्रश्न साबळे यांनी अक्षयला विचारला. यावर अक्षयनं जे काही उत्तर दिलं, ते ऐकून सर्वांचंच हसून हसून पोट दुखलं.

‘फार वर्षांपूर्वी माझी एक महाराष्ट्रीय गर्लफ्रेंड होती. तिच्या घरी जाऊन जाऊन मराठी शिकलो,’ असं अक्षय म्हणाला. तुम्हाला एखादी भाषा शिकायची असेल तर हा सर्वात उत्तम मार्ग आहे, असा गमतीगमतीला सल्लाही त्याने दिला. 
जॅकी श्रॉफसोबत अक्षय मस्तपैकी मस्ती करताना दिसला. जॅकी दादा, तू इतका ज्ञानी का आहेस? यावर जॅकीनंही मराठीत उत्तर दिलं. जास्त बोलायचं नाय, ऐकायचं जास्त.. आई-बाबा,आजी-आजोबा जे बोलतात, ते ऐकायचं. त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी घ्यायच्या. जे खराब आहे ते सोडून द्यावं, असं जॅकी म्हणाला.

झी मराठीने त्यांच्या युट्यूब चॅनलवर या एपिसोडचे दोन प्रोमो पोस्ट केले आहेत. यात अक्षय कुमार, जॅकी व रोहित शेट्टीच्या गप्पा आणि थुकरटवाडीतील विनोदवीरांची हसून हसून पोट दुखेल अशी कॉमेडी बघायला मिळतेय.  अक्षय कुमार आणि कतरिन कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी  चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Bollywood superstar Akshay Kumar to grace Chala Hawa Yeu Dya's Diwali special episode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.