'बरड'चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2016 04:34 AM2016-04-19T04:34:15+5:302016-04-19T10:04:15+5:30
गावकºयांमध्ये तर्कवितर्कांना उत येतो, यात स्वार्थाची पोळी भाजून घेणारे समाजकंटकदेखील असतात. ते गावातील भोळ्याभाबड्यांना फसविण्याचे काम करित असतात. आपापसात भांडणे सुरू होतात, नाती पणाला लागतात आणि यातूनच एकामागोमाग एक घटनांचा उलगडा होत जाणारा हा बरड चित्रपट आहे.
ुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकलेला तानाजी घाडगे दिग्दर्शित 'बरड' हा चित्रपटाचे नुकतेच मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.हा चित्रपट असाच वेगळ्या धाटणीचा आहे. खेडयातील दाहक वास्तव या बरडमध्ये मांडण्यात आले आहे. देवेंद्र कापडणीस लिखीत-निर्मित या चित्रपट असून यामध्ये सुहास पळशीकर, राजन पाटील, शहाजी काळे, भारत गणेशपुरे, संजय कुलकर्णी, नंदकिशोर कुलकर्णी या आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
ग्रामीण भाषेत ज्या जागेला बरड म्हणतात अशा ओसाड माळरानावर अचानक काही तरी काम सुरू होते, गावकºयांमध्ये तर्कवितर्कांना उत येतो, यात स्वार्थाची पोळी भाजून घेणारे समाजकंटकदेखील असतात. ते गावातील भोळ्याभाबड्यांना फसविण्याचे काम करित असतात. आपापसात भांडणे सुरू होतात, नाती पणाला लागतात आणि यातूनच एकामागोमाग एक घटनांचा उलगडा होत जाणारा हा बरड चित्रपट आहे. हा चित्रपट ३ जूनला रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.