Bus Bai Bus : 'नवऱ्याचा फोन चेक करता का?'; मेधा मांजरेकरांनी दिलं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 11:36 AM2022-08-08T11:36:42+5:302022-08-08T11:38:05+5:30

'बस बाई बस' (Bus Bai Bus) या शोमध्ये अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी नुकतीच हजेरी लावली आहे.

Bus Bai Bus : 'Do you check your husband's phone?'; Medha Manjrekar gave an amazing answer | Bus Bai Bus : 'नवऱ्याचा फोन चेक करता का?'; मेधा मांजरेकरांनी दिलं भन्नाट उत्तर

Bus Bai Bus : 'नवऱ्याचा फोन चेक करता का?'; मेधा मांजरेकरांनी दिलं भन्नाट उत्तर

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवर नुकताच 'बस बाई बस' (Bus Bai Bus) हा शो सुरू झाला. या शोचं सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) करत आहे. या शोमध्ये अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि सुप्रिया सुळे  (Supriya Sule) यांनी उपस्थिती लावली होती. आता या शोमध्ये नुकतीच अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी देखील हजेरी लावली आहे. झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडियावर या शोचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

बस बाई बसच्या नव्या प्रोमोत पाहायला मिळतंय की, सुबोध भावे हे मेधा यांना विचारतात घरातल्या गृहिणीला देखील अभिनय करावा लागतो? यावर मेधा, हो असं उत्तर देतात. तर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेनं मेधा मांजरेकर यांना प्रश्न विचारला की,'नवऱ्याचा फोन चेक करता का कधी?' या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं, 'आता नाही करत'. तसेच या शोमध्ये मेधा मांजरेकारांना त्यांच्या आई-वडिलांचा फोटो दाखवण्यात आला. हा फोटो पाहताच त्या इमोशनल झाल्या. फोटो पाहून त्या म्हणाल्या, 'माझ्या आई-वडिलांचे एका वर्षापूर्वी निधन झाले. नऊ महिन्याच्या गॅपने ते गेले.' 


'बस बाई बस' या शोबद्दल सुबोध म्हणाला की, ‘मला काहीतरी वेगळं किंवा नवीन करायची इच्छा होती. संगीत किंवा नृत्यांच्या स्पर्धांमध्ये आत एकसुरीपणा यायला लागला आहे. मी याआधी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे. पण, संवादाचा कार्यक्रम मी कधीच केला नव्हता आणि तो करायची माझी खूप इच्छा होती. त्यामुळे जेव्हा मला या कार्यक्रमाची संकल्पना कळली, तेव्हा मला ती खूप आवडली आणि लगेच मी होकार दिला.’ 

Web Title: Bus Bai Bus : 'Do you check your husband's phone?'; Medha Manjrekar gave an amazing answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.