धक्कादायक! अभिनेता करणवीर बोहरा आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 18:05 IST2022-06-16T17:55:37+5:302022-06-16T18:05:58+5:30
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी तजिंदर सिद्धू म्हणजेच टीजे सिद्धू यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! अभिनेता करणवीर बोहरा आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी तजिंदर सिद्धू म्हणजेच टीजे सिद्धू यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, अभिनेत्याने ४० वर्षीय महिलेकडून १.९९ कोटी रुपये घेतले होते आणि २.५ टक्के व्याजाने पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अभिनेत्याने आतापर्यंत फक्त 1 कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत केली आहे.
महिलेने आरोप केला आहे की जेव्हा तिने रक्कम मागितली तेव्हा बोहरा आणि त्यांची पत्नी तजिंदर सिद्धू यांनी टाळाटाळ केली आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अभिनेता मनोज बोहरा उर्फ करणवीर बोहरा याच्यासह ६ जणांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्याच वेळी, ओशिवरा पोलिस स्टेशनचे म्हणणे आहे की त्यांनी तपास सुरू केला आहे आणि ते लवकरच सर्व आरोपींचे जबाब नोंदवतील.
लॉकअपमध्ये म्हटलं होतं- 'मी कर्जबाजारी आहे'
करण बोहराने कंगना राणौवतच्या लॉकअॅप शोमध्ये असताना तो कर्जबाजारी असल्याचा खुलासा केला होता. गेल्या 7 वर्षांत मी माझ्या करिअरमध्ये काहीही चांगलं करू शकलो नाहीये. मी डोक्याच्या केसापासून तळपायाच्या नखापर्यंत कर्जात बुडालो आहे, असं तो म्हणाला.लोकांची देणी न दिल्यामुळे माझ्याविरोधात 3-4 केसेसही सुरू आहेत. मी अक्षरश: कर्जाच्या डोंगराखाली दबलो आहे, इच्छा असूनही मला बाहेर निघता येत नाहीये, असं तो म्हणाला होता.