‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ मालिकेतील कलाकारांनी लुटला पावसाचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 04:14 PM2022-07-25T16:14:29+5:302022-07-25T16:16:08+5:30
मुंबईतले लोक रजा काढून कर्जत-लोणावळ्याला पावसाची मजा अनुभवायला येतात. पण पावसाचा आनंद लुटण्यासाठी आम्हाला रजा काढण्याची गरज नाही. चित्रीकरण संपल्यावर किंवा सकाळी लवकर उठून आम्ही आसपासच्या डोंगरांवर लाँग ड्राइव्हवर जातो.
‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ या ऐतिहासिक मालिकेचे शूटिंग सध्या कर्जतला सुरु आहे. मालिकेचे शूट सांभाळून सध्या कलाकार मजा मस्तीदेखील करताना दिसतात.शूट संपल्यानंतर मालिकेचे कलाकार पावसाळ्यात कर्जतच्या आजूबाजूच्या परिसरात फेरफटका मारतात.पावसाळ्यात कर्जत हे पर्यटनासाठी एक उत्तम स्थळ आहे. कारण आजूबाजूला भरपूर हिरवाईने नटलेला निसर्ग, खळाळते धबधबे आणि खोल दऱ्यांचे दर्शन घेताना भान हरपून जाते. या मालिकेचे चित्रण कर्जतच्या परिसरात केले जात असून मालिकेतील कलाकार हे पावसात ट्रेकिंगला जाताना आणि निसर्गाची मजा लुटताना दिसत आहेत.
रोहित चंदेल म्हणाला, “कर्जतमध्ये 44 अंश डिग्रीचं तापमान सहन केल्यावर आता धमाल करण्याची संधी आली आहे. आम्ही सध्या पावसाळ्याचा मनसोक्त आनंद लुटत आहोत. कर्जतमध्ये चित्रीकरण करण्याचा सर्वात मोठा फायदा हाच आहे की तुम्हाला पावसात मजा करण्यासाठी दुसरीकडे कुठं जावं लागत नाही.
मुंबईतले लोक रजा काढून कर्जत-लोणावळ्याला पावसाची मजा अनुभवायला येतात. पण पावसाचा आनंद लुटण्यासाठी आम्हाला रजा काढण्याची गरज नाही. चित्रीकरण संपल्यावर किंवा सकाळी लवकर उठून आम्ही आसपासच्या डोंगरांवर लाँग ड्राइव्हवर जातो. आम्हाला काही सुंदर धबधबेही सापडले आहेत. पण यातील सर्वात उत्तम भाग म्हणजे इथे मिळणारे चमचमीत, स्वादिष्ट पदार्थ. काही आठवड्यांपूर्वी इथे प्रचंड पाऊस पडत होता, तेव्ही सर्वांनी हायवेवर चालत फिरण्याचा निर्णय घेतला.
वाटेत आम्ही रस्त्यालगतच्या एका टपरीवर थांबलो आणि गरम भजी आणि वाफाळत्या चहाचा आस्वाद घेतला. मी आजवर खाल्लेल्या सर्वात चवदार पदार्थांमध्ये त्याचा समावेश करीन. असे अनुभव मी जन्मात विसरणार नाही आणि ते माझ्या मनात कायमचे राहतील.”काशीबाई बाजीराव बल्लाळचे कलाकार सध्या पावसाचा आनंद लुटत आहेत.