छोट्यापडद्यावर साजरा करणार नवरात्रीच्या विविध छटांचा अनोखा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 10:30 AM2017-09-20T10:30:51+5:302017-09-22T16:00:35+5:30

नवरात्र अर्थात नऊ शुभ रात्री ह्या देवी दुर्गेच्या विविध अवतरांचे प्रतीक मानल्या जातात. या नऊ दिवसा मध्ये ह्या देवीची ...

Celebrating on the small papadas Navaratri's unique shade will be celebrated | छोट्यापडद्यावर साजरा करणार नवरात्रीच्या विविध छटांचा अनोखा सोहळा

छोट्यापडद्यावर साजरा करणार नवरात्रीच्या विविध छटांचा अनोखा सोहळा

googlenewsNext
रात्र अर्थात नऊ शुभ रात्री ह्या देवी दुर्गेच्या विविध अवतरांचे प्रतीक मानल्या जातात. या नऊ दिवसा मध्ये ह्या देवीची उपासना केली जाते करण ती निर्मिती, संगोपन आणि संहाराच्या शक्तीचे मूर्तिमंत रूप आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दार दिवशी एक अश्या  नऊ खास रंगाचे कपडे परिधान केले जातात ज्यांना नवरंग असे म्हटले जाते ह्यातील प्रत्येक रंग देवीच्या रूपांचे आणि शक्तीच्या अनेक छटांचे प्रतिनिधित्व करतो नवरात्र उत्सवाचे आणि ह्या नऊ रंगाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व सांगण्यासाठी अँड टीव्ही च्या प्रमुख नऊ अभिनेत्री तुमच्या भेटीला येत आहे.

हा पवित्र सण साजरा करण्यासाठी  प्रत्येकदिवशी अँड टीव्ही वरील एक नायिका नवरात्रीच्या त्या विशिष्ट दिवसाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रंगाचे कपडे परिधान करेल. ह्यावर्षी पहिल्या दिवसाचा रंग पिवळा असून तो उत्साह आणि आनंदाचे प्रतिनिधित्व करतो. 'वानी -रानी' मालिकेतील  रानी (तन्वी आझमी) ह्या दिवशी तुम्हाला पिवळया पेहरावांमध्ये दिसेल. 'अग्निफेरा' मालिकेतील रागिणी ( युक्ती कपुर) व तिची नणंद श्रुष्टी (सिमरन कौर) या दोघी नवरात्रीच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी अनुक्रमे हिरव्या व करड्या रंगाचे महत्त्व तुमच्यासमोर आणतील. चौथा दिवस आहे नारंगी  रंगासोबत सर्जनशीलता आणि उत्साह साजरा करण्याचा. या दिवशी संतोषी मातेची भक्ती संतोषी  (रतन राजपुर) ह्या रंगाच्या कापड्यामध्ये दिसेल. पांढरा  रंग शुद्धतेचे प्रतिनिधित्व करतो म्हणूनच  'बढो बहू' मालिकेतील शुद्ध मनाची  बढो (रतन राजपुर) पाचव्या दिवशी शुभरवस्त्रकिता बनेल तर सहाव्या दिवशी सत्ता आणि दिमाख ह्यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून  प्रीत (फरझान शेट्टी)  लाल रंगाच्या पेहरावात दिसेल. आपले आत्मिक बाळ निष्ठने जपणारी "भाभी जी घर पर है"मधली अंगुरी (शुभांगी अत्रे) सातव्या दिवशी शाही निळ्या रंगाच्या वस्त्रा मध्ये दिसेल. असे म्हणतात की प्रेमाच्या धाग्यात सारी मानवजात बांधली जाऊ शकते. याच प्रेमाचे प्रतीक असलेल्या गुलाबी रंगांच्या पेहरावात 'भाभीजी घर पर है' ची  अनिता आठव्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शेवटचा तरीही तितकाच महत्वाचा रंग आहे जांभळा . 'बकुला बुआ का भूत' मालिकेतील रेखा (अपरा मेहता) ऐशोअरमाचे प्रतीक असलेल्या ह्या जांभळ्या रंगाच्या छटेचे कपडे परिधान करणार आहे.

या संकल्पनेबद्धल बोलताना अंगुरी भाभी अर्थात शुभांगी अत्रे म्हणाली "मी अलिकडेच एंड टीव्हीच्या नवरात्र मालिकेतील प्रसंगसाठी शाही निळ्या कपड्यामध्ये  चित्रिकरण केले. 'भाभी जी घर पर है'मधील माझे हे पात्र त्याच्या साधेपणासाठी आणि प्रमाणिकपणासाठी ओळखले जाते. पण जेव्हा प्रश्न तिच्या कुटुंबाचा आणि घराचा असतो तेव्ह ती तिच्या व्यक्तिमत्वातून ताकद , शौर्य आणि आत्मबल हे गुण प्रतिबिंबित होतात. याच गुणांचे प्रतिनिधित्व निळा रंग करतो.

Web Title: Celebrating on the small papadas Navaratri's unique shade will be celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.