'छत्रीवाली' मालिकेतील विक्रमच्या साखरपुड्याला सेलिब्रिटींची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 17:31 IST2019-01-25T17:08:15+5:302019-01-25T17:31:42+5:30
विक्रमचा साखरपुडा नक्की मधुराशी होणार की नीलमशी याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. आईच्या अंतिम इच्छेखातर विक्रम नीलमशी लग्न करायला तयार झालाय.

'छत्रीवाली' मालिकेतील विक्रमच्या साखरपुड्याला सेलिब्रिटींची हजेरी
स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ या मालिकेत विक्रमच्या साखरपुड्याचं धमाकेदार सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. विक्रमचा साखरपुडा नक्की मधुराशी होणार की नीलमशी याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. आईच्या अंतिम इच्छेखातर विक्रम नीलमशी लग्न करायला तयार झालाय. पण मधुरावर त्याचं जीवापाड प्रेम आहे. विक्रम आणि मधुराच्या प्रेमकहाणीचा खरंच अंत होणार का? याचं उत्तर छत्रीवालीच्या पुढील भागांमध्ये मिळणार आहे.
विक्रमच्या साखरपुड्यासाठी खास पाहुण्यांनी हजेरी लावलीय. शिल्पा शिंदे, ऋषी सक्सेना आणि सायली संजीव विक्रमला शुभेच्छा देण्यासाठी साखरपुड्याला आवर्जून उपस्थित होते. शिल्पा शिंदेने ठसकेबाज लावणी सादर करत या सोहळ्याची रंगत वाढवली तर सायली संजीव आणि ऋषी सक्सेनाने रोमॅण्टिक गाण्यावर ठेका धरला.
‘छत्रीवाली’मध्ये मधुरा विक्रमची लव्हस्टोरी निर्णायक वळणावर येऊन पोहोचलीय. दोघांनीही आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिलीय. विक्रम आणि मधुराचं नातं निर्णायक वळणावर असतानाच आता सदानंद यांच्या एंट्रीने ही गुंतागुंत आणखी वाढणार आहे. एकीकडे मधुरावरचं प्रेम तर दुसरीकडे आईची अंतिम इच्छा हा गुंता विक्रम कसा सोडवणार? याची उत्कंठावर्धक कहाणी ‘छत्रीवाली’च्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. मधुराच्या आईला म्हणजेच होणाऱ्या सासुबाईंना विक्रम त्याच्या आणि मधुराच्या नात्यासाठी कसे तयार करणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.