'सेलिब्रिटी मास्टरशेफ'साठी निक्कीला किती मानधन मिळतं? बाईsssss आकडे वाचून चक्रावून जाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:18 IST2025-01-29T17:16:45+5:302025-01-29T17:18:08+5:30
'सेलिब्रिटी मास्टरशेफ'साठी निक्कीनं तगडं मानधन घेतलं आहे.

'सेलिब्रिटी मास्टरशेफ'साठी निक्कीला किती मानधन मिळतं? बाईsssss आकडे वाचून चक्रावून जाल!
Nikki Tamboli: अभिनेत्री निक्की तांबोळी ही 'बिग बॉस मराठी ५' मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. या कार्यक्रमातील त्याच्या खेळाचे काही प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं. तर काहींना मात्र तिला प्रचंड ट्रोल केलं. मात्र, निक्की 'बिग बॉस मराठी ५' ट्रॉफी उचलू शकली नव्हती. तिला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. आता ती पुन्हा एकदा 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' (Celebrity Masterchef) या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आली आहे.
'सेलिब्रिटी मास्टरशेफ' सुरू झाला आहे. यावेळी शोमध्ये अनेक स्टार्स त्यांचे स्वयंपाक कौशल्य दाखवत आहेत. दीपिका कक्कर, तेजस्वी प्रकाश, निक्की तांबोळी, फैसल शेख उर्फ फैसू, उषा नाडकर्णी, कविता सिंग, चंदन प्रभाकर आणि अभिजीत सावंत सहभागी झाले आहेत. या शोसाठी निक्कीनं तगडं मानधन घेतलं आहे.
'सेलिब्रिटी मास्टरशेफ'साठी निक्की किती मानधन घेतेय, याची चर्चाही प्रेक्षकांमध्ये आहे. निक्की तांबोळी ही महागडी स्पर्धक असल्याचं बोललं जातं. मीडिया रिपोर्टनुसार, निक्की तांबोळीला दर आठवड्याला १.५ लाख फी मिळत आहे. आता निक्की मास्टरशेफचा प्रतिष्ठित किताब जिंकणार का? हे लवकरच कळेल. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर २७ जानेवारीपासून आणि दर सोमवार ते शुक्रवार प्रसारित करण्यात येत आहे