'ये रिश्ता क्या कहलाता'ची ही अभिनेत्री गेलीय डिप्रेशनमध्ये, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 03:21 PM2020-05-13T15:21:57+5:302020-05-13T15:41:14+5:30

गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत आहे.

Chahatt khanna in depresion gda | 'ये रिश्ता क्या कहलाता'ची ही अभिनेत्री गेलीय डिप्रेशनमध्ये, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

'ये रिश्ता क्या कहलाता'ची ही अभिनेत्री गेलीय डिप्रेशनमध्ये, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

googlenewsNext

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री चाहत खन्ना गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत आहे. लॉकडाऊनच्या काळात चाहत व मिकाचा हा फोटो समोर आल्याने सगळीकडे या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. मिकाने चाहतसोबतचे अनेक रोमॅन्टिक फोटो शेअर केले. ‘क्वारंटाईनदरम्यान घरात खूप काही करता येण्यासारखे आहे. संगीत शिका, कला शिका, पार्टनरवर प्रेम करा, आवडीचे जेवण बनवा,’ असे त्याने लिहिले. लॉकडाऊन दरम्यान चाहत आणि मिका एकमेंकासोबतचे  रोमॅन्टिक फोटो शेअर करत होते. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार याच सगळ्या दरम्यान चाहत डिप्रेशनमध्ये असल्याचे समजतेय.

काही दिवसांपूर्वी चाहतच्या सिंगल मदर होण्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यूजर्सने याबाबत चाहतला खरी-खोटी सुनावली होती. यावर चाहतने इन्स्टाग्रामवर एक पोस्टदेखील शेअर केली होती आणि ती कोणत्याच गोष्टीपासून पळत नाहीय. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार चाहत म्हणाली, मला डिप्रेशनबाबत आधी माहिती नव्हते. मला जर याची कल्पना असती तर मी यातून बाहेर आलो असतो. मला आणि माझ्या काऊंसलर हे समझण्यास वेळ लागले की मी या आजारातून जातेय. मला कळलेच नाही की मी कधी डिप्रेशनची शिकार झाले. यातून बाहेर येण्यासाठी मी सतत्याने प्रयत्न करतेय.

बडे अच्छे लगते है या मालिकेमुळे चाहता खन्ना चांगलीच नावारूपाला आली. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. कबूल है 'कुमकुम: प्यारा सा बंधन', 'तुझ संग प्रीत लगाई सजना' आणि 'हीरो भक्ति की शक्ति है' यांसारख्या मालिकेत झळकली होती. संजय दत्तच्या  प्रस्थानम सिनेमात ती झळकली होती.

Web Title: Chahatt khanna in depresion gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.