"चल दो ना साथ मेरे...", नारकर दाम्पत्याचा रोमँटिक व्हिडीओ चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:41 IST2025-01-04T13:41:24+5:302025-01-04T13:41:56+5:30
Avinash Narkar And Aishwarya Narkar : अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे आहे. हे कपल सतत चर्चेत येत असते.

"चल दो ना साथ मेरे...", नारकर दाम्पत्याचा रोमँटिक व्हिडीओ चर्चेत
अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे आहे. हे कपल सतत चर्चेत येत असते. ते दोघे सोशल मीडियावर सक्रीय असून ते बऱ्याचदा रिल करताना दिसतात. या रिलमुळे कधीकधी त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र तरीदेखील ते वेगवेगळे ट्रेडिंग रिल बनवत असतात आणि त्यांचे हे रिल चर्चेतही येतात. दरम्यान आता अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांचा लेटेस्ट रिल चर्चेत आला आहे.
अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचा सोशल मीडियावर नवीन रिल पाहायला मिळत आहे. यात ते दोघे चल दो ना साथ मेरे या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या रिलमध्ये ऐश्वर्या यांनी ब्राउन रंगाची साडी नेसली आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. तर अविनाश यांनी ब्लॅक रंगाचा प्रिंटेड शर्ट आणि डेनिम पॅण्ट घातली आहे. या रिलमध्ये ते दोघे रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे. त्यांच्या या रिलला नेहमीप्रमाणे चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
ऐश्वर्या आणि अविनाश यांनी १९९५ साली लग्नगाठ बांधली होती. नुकतेच त्यांच्या लग्नाला २९ वर्ष पूर्ण झाली आहेत. सिनेइंडस्ट्रीतील ते आदर्श कपल आहेत. ते दोघे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. अनेक रील व्हिडिओ ते शेअर करताना दिसतात. त्यांच्या व्हिडिओला चाहत्यांकडून तुफान प्रतिसादही मिळतो.
वर्कफ्रंट
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर मराठी मालिकेत काम करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या यांची लोकप्रिय मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगीने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील ऐश्वर्या यांनी साकारलेल्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. अविनाश नारकर सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काम करताना दिसत आहेत.