'चला हवा येउ द्या'चा आषाढी एकादशी निमित्त वारी विशेष भागात सहभागी होणार 'हे' सेलिब्रेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 02:36 PM2018-07-20T14:36:11+5:302018-07-20T14:36:39+5:30

हास्यकल्लोळ सोबतच या आठवड्यात प्रेक्षकांना सुमधुर सुरांचा आस्वाद देखील घ्यायला मिळणार आहे. तसेच या भागात विनोदवीर 'पडोसन' या हिंदी चित्रपटाचे स्पूफ सादर करून प्रेक्षकांना हसायला भाग पडणार आहेत.

Chala Hawa Yeu Dya Ashadhi Ekadashi Special Episode | 'चला हवा येउ द्या'चा आषाढी एकादशी निमित्त वारी विशेष भागात सहभागी होणार 'हे' सेलिब्रेटी

'चला हवा येउ द्या'चा आषाढी एकादशी निमित्त वारी विशेष भागात सहभागी होणार 'हे' सेलिब्रेटी

googlenewsNext

थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. रसिकांना ते पोटधरुन हसवतात. मात्र या सगळ्या विनोदवीरांना एका धाग्यात पकडून ठेवणारा, त्यांच्याकडून अभिनय करवून घेणारा त्यांचा सूत्रधार आणि थुकरटवाडीचा कॅप्टन ऑफ शिप म्हणजे होस्ट डॉ. निलेश साबळे. चला हवा येऊ द्या या शोची धुरा डॉ. निलेश साबळे यशस्वीरित्या सांभाळत आहे. शोचं लेखन, स्वरुप, दिग्दर्शन ही जबाबदारी निलेशने समर्थपणे पेलली आहे. 

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. येत्या भागात हजेरी लावणार आहेत गायक ज्ञानेश्वर मेश्राम आणि सारेगमप लिटिल चॅम्प फेम कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे. निमित्त आहे आषाढी एकादशीचे. ह्या संगीतमय भागात अवघी थुकरटवाडी भक्तिमय होणार आहे. हास्यकल्लोळ सोबतच या आठवड्यात प्रेक्षकांना सुमधुर सुरांचा आस्वाद देखील घ्यायला मिळणार आहे. तसेच या भागात विनोदवीर 'पडोसन' या हिंदी चित्रपटाचे स्पूफ सादर करून प्रेक्षकांना हसायला भाग पडणार आहेत. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर यावेळी अनन्या नाटकाची टीम देखील उपस्थित होती तसेच मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार देखील या मंचावर सज्ज होते. 

या विनोदवीरांमध्ये श्रेया बुगडेही काही मागे नाही. तीसुद्धा शोमध्ये कधी श्रीदेवीची मिमिक्री करते तर कधी हटके भूमिका साकारुन रसिकांचं मनोरंजन करते.अशीच धम्माल श्रेयानं परदेश दौ-यातही  केली होती.छोट्या पडद्यावर रसिकांना हसवणा-या श्रेयानं ही परदेशवारीही बरीच एन्जॉय केली. यावेळी विविध कलाकारांची मिमिक्री करत परदेशातील आपल्या फॅन्सचं मनोरंजन केलं.यावेळी श्रेया आणि टीमनं पॅरिसच्या प्रसिद्ध अशा आयफेल टॉवरलाही भेट दिली होती. याशिवाय लंडन आणि पॅरिसमधील विविध ठिकाणी जात 'चला हवा येऊ द्या' शोच्या टीमनं परदेशवारीचा मनमुराद आनंद लुटला.याच परदेशवारीचे विविध फोटो श्रेयानं सोशल मीडियावर शेअर केले होते.

Web Title: Chala Hawa Yeu Dya Ashadhi Ekadashi Special Episode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.