'पर वो Room service वाली हो'; श्रेया बुगडेने शेअर केलेली 'ती' पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 16:08 IST2022-06-09T16:07:57+5:302022-06-09T16:08:47+5:30
Shreya Bugde: रविवारचा सुट्टीचा दिवस पाहून श्रेयाने नवीन ठिकाणाला भेट दिली. येथील एक फोटो तिने शेअर केला.

'पर वो Room service वाली हो'; श्रेया बुगडेने शेअर केलेली 'ती' पोस्ट चर्चेत
श्रेया बुगडे (Shreya Bugde ) हे नाव आजच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. विनोदाच्या जगतात स्त्रीदेखील मागे नाहीत हे श्रेयाने दाखवून दिलं. त्यामुळे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधील ती हुकमी एक्का असल्याचं पाहायला मिळतं. या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली श्रेया सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती काही नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
श्रेयाला अभिनयासह पर्यटनाचीही विशेष आवड आहे. त्यामुळे ती बिझी शेड्युलमधून वेळ काढून नवनवीन ठिकाणांना भेट देत असते. यात अलिकडेच तिने एका नव्या ठिकाणाला भेट दिली. येथील काही फोटो तिने इन्स्टावर शेअर केले आहेत. यात एका फोटोला तिने दिलेलं कॅप्शन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
रविवारचा सुट्टीचा दिवस पाहून श्रेयाने नवीन ठिकाणाला भेट दिली. येथील एक फोटो तिने शेअर केला. या फोटोमध्ये ती चहा पित असून तिने भन्नाट कॅप्शन दिलं आहे. "एक गरम चाय कि प्याली हो ....पर वो Room service वाली हो #sundaythoughts", असं कॅप्शन श्रेयाने या फोटोला दिलं आहे.
दरम्यान, श्रेया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती सातत्याने चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. कधी सेटवरील तर कधी वैयक्तिक जीवनातील फोटो, व्हिडीओ शेअर करत ती तिचे पर्सनल अपडेट्स चाहत्यांना देत असते.