मला छोटू म्हणा, बुटक्या म्हणा...! ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढावेने व्यक्त केली ‘भावना’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 03:07 PM2020-08-16T15:07:56+5:302020-08-16T15:09:15+5:30

‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या अंकुर वाढावे याची एक फेसबुक पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय.

chala hawa yeu dya fame ankur wadhave fb post viral | मला छोटू म्हणा, बुटक्या म्हणा...! ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढावेने व्यक्त केली ‘भावना’

मला छोटू म्हणा, बुटक्या म्हणा...! ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढावेने व्यक्त केली ‘भावना’

googlenewsNext
ठळक मुद्दे  अंकुर वाढवे हा जसा एक चांगला अभिनेता आहे, तसाच तो एक उत्तम कवीही आहे. त्याचा एक कवितासंग्रह देखील प्रकाशित आहे.

चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या अंकुर वाढावे याची एक फेसबुक पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. माझ्यामुळे भावना दुखावलेल्यांची जाहीर माफी मागतो... असे म्हणत अंकुरने फेसबुकवर एक कविता पोस्ट केली आहे. आता माझ्या भावना दुखावणार नाहीत. कारण त्या आता दुखावून दुखावून बोथट झाल्या आहेत, असे या कवितेत तो म्हणतो. अंकुरने पोस्ट केलेली ही कविता उंची, वर्ण व दिसण्यावरून लोकांनी चेष्टा  आणि यामुळे अनुभवलेली व्यथा त्याने या कवितेतून व्यक्त केली आहे.
शारिरीक मर्यांदांवर मात करत अंकुरने अभिनय कौशल्य सिद्ध केले. मात्र काही लोकांनी त्याच्या अभिनय कौशल्याकडे दुर्लक्ष करत त्याच्या शारिरीक मर्यादांवरून कायम त्याची चेष्टा केली. लोकांच्या शारिरीक मर्यादांवर व्यंग करणाºयांसाठी अंकुरची ही कविता  सणसणीत चपराक मारते.
‘सगळ्यांच्या भावनांचा आदर ठेवून माझ्या स्वत:च्या भावना व्यक्त करतोय. माझ्या मुळे भावना दुखावलेल्यांची जाहीर माफी मागतो,’ असे लिहित त्याने ही कविता पोस्ट केली आहे. ‘भावना’ असे या कवितेचे नाव आहे.

कवितेत तो लिहितो,


मला छोटू म्हणा 
बुटक्या म्हणा 
म्हणा हवा तर 
बारक्या बोच्याच्या  
माझ्या भावना दुखणार नाहीत;
प्रपोस केला तर 
दादा म्हणा 
तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती म्हणा 
म्हणा हवं तर तोंड पहिला का आरशात 
भावना माझ्या दुखत नाहीत;
कुत्रे मागे लागो 
की लागो लहान मुलांचा जत्था 
‘ओय बारका माणूस!’
भावना  माझ्या दुखणार नाहीत;
रस्त्यावर उभा असताना 
उगाच टपली मारून जा 
जा बुडावर चापटी मारून 
भावना माज्या दुखणार नाहीत;
‘हा चुत्या आहे याला काय..’ म्हणा 
सल्ला दिला तर बिंधास्त
‘हुशारी मारू नको’ म्हणा 
भावना माझ्या  दुखणार नाहीत 
होय, नाही दुखणार 
भावना उथळ असतात...
....
त्या आता माझ्या दुखावून दुखावून 
झाल्या बोथड....


 अंकुर वाढवे हा जसा एक चांगला अभिनेता आहे, तसाच तो एक उत्तम कवीही आहे. त्याचा एक कवितासंग्रह देखील प्रकाशित आहे. ‘पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी’ असे या कवितासंग्रहाचे नाव आहे. अंकुशने सुरुवातीला अभिनेते संजय नार्वेकर यांच्यासोबत एका नाटकात काम केले. त्याने या संधीचे सोने केले. पुढे त्याने गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस,आम्ही सारे फर्स्ट क्लास , सायलेन्स , कन्हैय्या यासारख्या नाटकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. ‘जलसा’ या मराठी चित्रपटातही त्याने काम केले. यानंतर त्याला ‘चला हवा येऊ द्या’मध्येही काम करण्याची संधी मिळाली. मालिकेतील छोटूच्या भूमिकेने तो प्रत्येकाच्या घराघरात जाऊन पोहोचला.

Web Title: chala hawa yeu dya fame ankur wadhave fb post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.