'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदमच्या लेकीनं वाढदिवसानिमित्त केलं हटके फोटोशूट, दिसली खूपच ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 19:19 IST2022-07-26T19:19:34+5:302022-07-26T19:19:55+5:30
Bhau Kadam : भाऊ कदमची लेक मृण्मयी कदम दिसायला आहे खूपच सुंदर. आज तिचा वाढदिवस असून तिने या निमित्ताने हटके फोटोशूट केले आहे.

'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदमच्या लेकीनं वाढदिवसानिमित्त केलं हटके फोटोशूट, दिसली खूपच ग्लॅमरस
'चला हवा येऊ द्या' (chala hawa yeu dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊ कदम (Bhau Kadam) घराघरात पोहोचला. त्यामुळे त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. भाऊची लाडकी लेक मृण्मयी कदम (Mrunmayee Kadam). मृण्मयी ही भाऊची मोठी लेक. मृण्मयीचा हा व्हीडिओ खूप व्हायरल झाला होत. आणि यावेळी पहिल्यांदाच मृण्मयी कदम ही प्रसिद्धीझोतात आली होती.
आज मृण्मयीचा वाढदिवस असून यानिमित्ताने तिने हटके फोटोशूट शेअर केले आहे. मृण्मयी ही भाऊंची मोठी लेक. भाऊ आणि मृण्मयी सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. सध्या मृण्मयी सुद्धा बाबांच्या पावलावर पाऊल टाकत स्वतंत्रपणे आपली ओळख बनवण्याचा प्रयत्न करतेय. तिला अभिनय क्षेत्रात काम करायची इच्छा आहे. मृण्मयीचे तिच्या बाबांवर खूप प्रेम आहे.
मृण्मयी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. मृण्मयीने के. जी. जोशी आणि एन. जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केले. तिचे स्वत:चे युट्यूब चॅनल आहे आणि त्याचे हजारो सबस्क्राइबर्स आहेत.
मृण्मयीशिवाय भाऊला दोन मुली आणि एक मुलगा आहे, संचिता, समृद्धी व आराध्य अशी त्यांची नावं. मृण्मयीच्या नामकरण एका मालिकेवरून झाले होते. म्हणजेच त्यामागेही एक किस्सा आहे. ‘मृण्मयी’ नावाची एक मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेवरूनच आजीने नातीचे मृण्मयी असे नामकरण केले होते.