'चला हवा येऊ' मधून श्रेया बुगडे घेतली सुट्टी अन् थेट गाठलं कोल्हापूर, आता समोर आलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 06:25 PM2023-04-01T18:25:19+5:302023-04-01T18:56:12+5:30

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधील ती हुकमी एक्का असलेल्या श्रेया बुगडे सध्या सुट्टीवर आहे.

Chala hawa yeu dya fame shreya bugde ambabai darshan kolhapur | 'चला हवा येऊ' मधून श्रेया बुगडे घेतली सुट्टी अन् थेट गाठलं कोल्हापूर, आता समोर आलं कारण

'चला हवा येऊ' मधून श्रेया बुगडे घेतली सुट्टी अन् थेट गाठलं कोल्हापूर, आता समोर आलं कारण

googlenewsNext

'चला हवा येऊ द्या' या शोमधले सर्वच कलाकार नेहमी धमाल मस्ती करत असतात. त्यात सेलिब्रिटींची मिमिक्री करणं, हुबेहुब नकला करणं या कलाकारांना फार छान जमतं. या कलाकारांमध्ये नेहमी उठुन दिसते ती सर्वांची लाडकी श्रेया बुगडे. श्रेया आपल्या अप्रतिम अभिनयाने नेहमी लक्ष वेधतेच. श्रेया बुगडे (Shreya Bugde ) हे नाव आजच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. विनोदाच्या जगतात स्त्रीदेखील मागे नाहीत हे श्रेयाने दाखवून दिलं. त्यामुळे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधील ती हुकमी एक्का असल्याचं पाहायला मिळतं. मात्र श्रेया सध्या 'चला हवा येऊ द्या' शोमधून सुट्टी घेतली आहे.

श्रेया सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती काही नवनवीन पोस्ट शेअर करत असते. श्रेया बुगडेने तिच्या इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर केला होता. यात ती कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी पोहोचलेली दिसतेय. फोटोमध्ये श्रेया अंबाबाईसमोर हात जोडून उभी दिसतेय. श्रेयाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झाले होते. 

श्रेयाच्या कॉमेडीचे आणि तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. यशोमुळे श्रेयाला अफाट प्रसिद्धी मिळाली आहे. श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे. अगदी कमी वयात अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणा-या श्रेयानं नाटक, टीव्ही या माध्यमांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘तू तिथे मी’, ‘अस्मिता’, ‘फू बाई फू’ अशा मालिकांमधून श्रेयाने मराठी रसिकांवर जादू केली आहे. मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेतही नाटकं सादर केली आहेत. 
 

Web Title: Chala hawa yeu dya fame shreya bugde ambabai darshan kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.