The Kapil Sharma Show : प्रोमो शूट केला अन् ऐनवेळी दिला नकार, ‘द कपिल शर्मा शो’मधून आणखी एक गडी ‘बाद’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 01:25 PM2022-09-08T13:25:25+5:302022-09-08T13:25:53+5:30
The Kapil Sharma Show : कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ येत्या 10 तारखेपासून प्रेक्षकांना हसवायला येतोय. पण यावेळी या शोमध्ये काही जुने चेहरे नसतील. होय, कृष्णा, भारती या सीझनमधून गायब असतील. आता आणखी एक गडी या शोमधून बाद झाला आहे...
कपिल शर्माचा (Kapil Sharma ) ‘द कपिल शर्मा शो’ ( The Kapil Sharma Show ) हा कार्यक्रम येत्या 10 तारखेपासून प्रेक्षकांना हसवायला येतोय. पण यावेळी या शोमध्ये काही जुने चेहरे नसतील. होय, कृष्णा अभिषेक या सीझनमध्ये दिसणार नाही. भारती सिंह ही सुद्धा या सीझनमधून गायब असेल. आता आणखी एक गडी या शोमधून बाद झाला आहे. ऐनवेळी त्याने शो सोडल्याची बातमी आल्याने चाहतेही हैराण आहेत.
होय, ‘द कपिल शर्मा शो’मधील चंदू चायवाला अर्थात चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar) शोमधून बाहेर पडला आहे. खास म्हणजे, ‘द कपिल शर्मा शो’च्या नव्या सीझनच्या प्रोमोमध्ये चंदन दिसला होता. नव्या सीझनमध्ये त्याचं कॅरेक्टरही अपग्रेड करण्यात आलं होतं. या सीझनमध्ये एकटा चंदू चायवाला नाही तर सोबत त्याची पत्नी व मुलंही दिसणार होते. असं असताना अचानक चंदू चायवाला शोचा भाग नसल्याचं कळतंय. चंदनने असा अचानक शो सोडल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. कपिल शर्मासोबत काही बिनसलं की यामागे आणखी काही कारण आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कपिल व चंदन दोघंही चांगले मित्र आहेत. तूर्तास तरी दोघांमध्ये कुठल्याही वादाची वा भांडणाची खबर नाही. मग चंदनने ‘द कपिल शर्मा शो’ का सोडला? तर त्याचा खुलासा खुद्द चंदननेच केला आहे.
‘मी ऑफिशिअली शो सोडत आहे. यामागे काहीही कारण नाही. फक्त मला ब्रेक हवा होता,’असं चंदनने सांगितलं आहे. चंदन कपिलच्या ऑस्ट्रेलिया टूरमध्येही नव्हता. या टूरवर किकू शारदा, कृष्णा अभिषेक त्याच्यासोबत गेले होत
चंदनआधी कृष्णा अभिषेक व भारती सिंग यांनी शो सोडल्याचं कन्फर्म केलं होतं. मोनेटरी अॅग्रीमेंटमुळे काही अडचण निर्माण झाली, त्यामुळे मी शोमध्ये नसल्याचं कृष्णाने स्पष्ट केलं होतं. तर भारत सिंग अन्य प्रोजेक्टमध्ये बिझी असल्याने तिने यावेळी शोला नकार दिला होता. मला मुलगा आहे, अन्य प्रोजेक्ट आहेत. मला आणखी प्रेशर नको होतं म्हणून मी नकार दिला, असं तिने म्हटलं होतं.