चाळीत घर, तीन बहिणी, कुटुंबाची जबाबदारी अन्…; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने खडतर प्रवासाबद्दल केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 12:36 PM2023-04-07T12:36:54+5:302023-04-07T12:37:28+5:30

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधील कलाकारांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. तसेच याशोमुळे काही विनोदवीरांचे नशिबच बदलले आहे.

Chawl house, three sisters, family responsibilities and…; 'Maharashtrachi Hasyajatra' fame actor revealed about the tough journey | चाळीत घर, तीन बहिणी, कुटुंबाची जबाबदारी अन्…; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने खडतर प्रवासाबद्दल केला खुलासा

चाळीत घर, तीन बहिणी, कुटुंबाची जबाबदारी अन्…; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने खडतर प्रवासाबद्दल केला खुलासा

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा(Maharashtrachi Hasyajatra)वर प्रेक्षक अगदी भरभरुन प्रेम करतात. या शोमधील प्रत्येक विनोदवीराने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. यामुळे काही विनोदवीरांचे नशिबच बदलले आहे. त्यातीलच एक विनोदवीर म्हणजे सर्वांचा लाडका दत्तू उर्फ दत्ता मोरे (Dutta More).

दत्तू मोरेचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. तो ठाण्यातील वागळे इस्टेट रामनगर परिसरातील चाळीत राहतो. दत्तू राहत असलेल्या चाळीला दत्तू चाळ असे नाव देण्यात आले आहे. तीन बहिणी, आई-वडील असा दत्तूचा परिवार आहे. या सगळ्यांचा सांभाळ तोच करतो. याशिवाय आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना घरात बसून छोटी मोठी कामेही या भावंडांनी केली आहेत. 

अल्ट्रा मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत दत्तूने खडतर प्रवासाबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला, शाळेत असताना मला नृत्य, नाटकाची आवड होती. महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर कलाविश्वात काम करायचे असेल तर काय करावे हे मला तेव्हा कळले नाही. दरम्यान मी एकांकीकासाठी बॅक स्टेज काम करु लागलो. बॅक स्टेज आर्ट्ससाठी काम करत असताना एकांकीकेमध्ये छोट्या छोट्या भूमिका मिळत गेल्या. तिथून माझा हा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.


तो पुढे म्हणाला की, पण त्यानंतरही मध्यंतरी असा एक काळ होता जेव्हा मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करू लागलो. हिंदी तसेच मराठी मालिकांसाठी जवळपास चार वर्षे मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होतो. यादरम्यानच मी महाराष्ट्राची हास्यजत्रासाठी काम करायला सुरुवात केली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या प्रॉडक्शनमध्ये मी काम करत होतो. प्रॉडक्शनमध्ये काम करत असताना मला एका स्किटमध्ये छोटी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. 

Web Title: Chawl house, three sisters, family responsibilities and…; 'Maharashtrachi Hasyajatra' fame actor revealed about the tough journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.