Bigg Boss 13 Promo 2 : सिझनच्या दुसरा प्रोमोमध्ये शेफ बनला सलमान, किचनमध्ये लावणार मनोंरजनाचा तडका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 06:30 AM2019-09-17T06:30:00+5:302019-09-17T06:30:00+5:30
Bigg Boss 13 आपल्या कॉमेडी पंच मुळे सुरूवातीपासूनच सीझनचा मनोरंजनाचा बार उंचावला जाणार आहे.
'बिग बॉस' चे 13 वे सीजन लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. दरवर्षी प्रमाणे हटके स्वरूपात हा शो पाहायला मिळतो. यंदाही नवीन हटके स्वरूपात हा शो असणार आहे. यंदाच्या सिझनमध्येही अनेक बदल केले गेले आहेत. फॅन्स या शोची खूप उत्सुकतेने वाट पाहात आहेत. विशेष म्हणजे सलमान खान पहिला प्रोमोत तो स्टेशन मास्टराच्या वेशात पाहायला मिळाला होता . केबिनमध्ये बसलेल्या रेल्वेच्या हादऱ्यांनी हलणारा सलमान नवीन सीझनची संकल्पना आणि अपेक्षेप्रमाणे तो वेगवान शो कसा बनणार आहे हे स्पष्ट करताना दिसला होता. तर आता बिग बॉस 13 व्या सिझनचा दुसरा प्रोमो शूट करण्यात आला आहे.
यांत सलमान शेफचा ड्रेस घालून किचनमध्ये काहीतरी बनवताना दिसत आहे. शेफ बनलेला सलमान पुढे आणखीन नवनवीन गोष्टींचा तडका शोमध्ये लावणार हे मात्र नक्की. बिग बॉसच्या घरातील सदस्य, त्यांचा स्वभाव आणि विविध परिस्थितींशी सामना करण्याची त्यांची ताकद अशा अनेक घडामोडी पाहणे रसिकांना आवडते. बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये सर्व सेलिब्रिटींचा समावेश असणार आहे, आणि त्या पंच मुळे सुरूवातीपासूनच सीझनचा मनोरंजनाचा बार उंचावला जाणार आहे.
हा डबिंग आर्टिस्ट देतो बिग बॉसला आवाज, या आवाजाने केलीय प्रेक्षकांवर जादू
बिग बॉस या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनपासूनच प्रेक्षक या आवाजाच्या प्रेमात पडले आहेत. हा आवाज कोणाचा आहे हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनपासूनच अतुल कुमार यांचा आवाज या कार्यक्रमाला लाभलेला आहे. त्यांच्या या आवाजामुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
अतुल कुमार हे अनेक वर्षांपासून डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करतात. ते 2002 ला या क्षेत्रात आले. या क्षेत्रात प्रस्थापित व्हायच्याआधी त्यांनी काही छोट्या-मोठ्या नोकऱ्या देखील केल्या आहेत. सोनी टिव्हीने त्यांना 2003 मध्ये पहिला मोठा ब्रेक दिला. मोना सिंगची जस्सी जैसी कोई नही ही मालिका प्रचंड गाजली होती. याच मालिकेच्या काही प्रोमोमध्ये अतुलचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला होता. त्यांनी आजवर अनेक पाश्चिमात्य देशातील मालिका, चित्रपटांना हिंदी भाषेत डब केले आहे.