LockDownमध्ये गरिबांसाठी हा सेलिब्रेटी ठरला अन्नदाता,आतापर्यंत 20 लाख लोकांपर्यंत पोहोचवले जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 03:04 PM2020-06-12T15:04:18+5:302020-06-12T15:07:06+5:30

कोरोना व्हायरसच्या या गंभीर संकटात अनेक सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अनेकांनी आपआपल्या परीने मदत करत सरकारच्या प्रयत्नांना साथ दिली आहे.

Chef Vikas Khanna teamed up with Bigg Boss fame Laxminarayan Tripathi to feed 2 million people | LockDownमध्ये गरिबांसाठी हा सेलिब्रेटी ठरला अन्नदाता,आतापर्यंत 20 लाख लोकांपर्यंत पोहोचवले जेवण

LockDownमध्ये गरिबांसाठी हा सेलिब्रेटी ठरला अन्नदाता,आतापर्यंत 20 लाख लोकांपर्यंत पोहोचवले जेवण

googlenewsNext


कोरोना व्हायरस भारतात दाखल झाल्यानंतर या विषाणूंचा फैलाव अधिक वाढू नये म्हणून सरकार सतर्क होते. वाढता धोका टाळण्यासाठी देश  लॉकडाऊन करण्यात आला.कोरोना व्हायरसच्या या गंभीर संकटात अनेक सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अनेकांनी आपआपल्या परीने मदत करत सरकारच्या प्रयत्नांना साथ दिली आहे.

लाॅकडाऊनमुळे रोजंदारीवर असलेल्या कुटूंबियांचे चांगलेच हाल झाले आहेत.लॉकडाऊनमुळे अनेकांना दोन वेळेचे अन्न मिळणेही मुश्किल झाले असताना प्रसिद्ध शेफ विकास खन्ना गरजु लोकांच्या मदतीला धावून आला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून तो किन्नर आखाडा प्रमुख लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्यासोबत मिळून आतापर्यंत २० लाख लोकांना जेवण उपलब्ध करून दिले आहे.मात्र त्याने या गोष्टीचे निमित्त साधून प्रसिद्ध मिळवली नाही. आता केलेल्या कार्यामधून ख-या अर्थाने आनंद मिळत असल्याचे त्याने म्हटले आहे.  त्याचा व्हिडीओ विकास यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. ही संख्या एकत्र करून, त्यांनी आतापर्यंत 120 लाखांहून अधिक गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचवले आहे.

विशेष म्हणजे विकास भारतात नाही. विकास न्यूयॉर्कमध्ये आहे, परंतु गरजूंना अन्न पुरवण्यासाठी तो सातत्याने कार्यरत आहेत. न्यूयॉर्कमध्ये असल्याने तो या बरकत या संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकला नाही. परंतु काही मित्रांनी फोटो एडिटिंगच्या माध्यमातून त्याला या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा आनंद दिला. विकास यांनी फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Web Title: Chef Vikas Khanna teamed up with Bigg Boss fame Laxminarayan Tripathi to feed 2 million people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.