​पेशवा बाजीरावमध्ये चेतन हंसराजची होणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2017 10:15 AM2017-05-03T10:15:15+5:302017-05-03T15:45:15+5:30

चेतन हंसराजने कुसूम या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो कहानी घर घर की, विरुद्ध, धरती का वीर ...

Chetan Hansraj's entry will be done in Peshwa Bajirao | ​पेशवा बाजीरावमध्ये चेतन हंसराजची होणार एंट्री

​पेशवा बाजीरावमध्ये चेतन हंसराजची होणार एंट्री

googlenewsNext
तन हंसराजने कुसूम या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो कहानी घर घर की, विरुद्ध, धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान यांसारख्या मालिकांमध्ये झळकला. कहानी घर घर की या मालिकेत त्याने साकारलेला खलनायक तर प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. आता चेतनची एका नव्या मालिकेत एंट्री होणार असून या मालिकेत तो एक ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. 
चेतनचा बाजीराव मस्तानी या मालिकेत लवकरच प्रवेश होणार असून या मालिकेत तो मुघल सम्राट औरंगजेबचा मोठा मुलगा मुहम्मद आझम शाहची भूमिका साकारणार आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाला चेतनने सुरुवातदेखील केली आहे. या भूमिकेसाठी चेतन हंसराजच योग्य असल्याचे या मालिकेच्या टीमचे म्हणणे असल्याने त्याला या मालिकेसाठी विचारण्यात आले आणि त्यानेदेखील या मालिकेसाठी होकार दिला. तो पेशवा बाजीराव ही मालिका सुरुवातीपासून पाहात आहे. त्यामुळे या मालिकेचा तो फॅन आहे. या मालिकेत काम करायला मिळत असल्याने सध्या तो खूपच खूशच आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेविषयी चेतन सांगतो, या मालिकेत ऐतिहासिक काळाची भव्यता आणि वास्तविकता अतिशय सुरेखरित्या चित्रीत केली जात आहे आणि त्यामुळे मी या मालिकेचा फॅन आहे. या मालिकेत एक भूमिका साकारण्यासाठी विचारले गेले असता मी क्षणाचाही विचार न करता या मालिकेसाठी होकार दिला. या मालिकेत औरंगजेबच्या मोठ्या मुलाची म्हणजेच मुहम्मद आझम शाहची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. पण सध्या या भूमिकेवर मी प्रचंड मेहनत घेत आहे. पेशवा बाजीराव या मालिकेला आतापर्यंत प्रेक्षकांनी खूप प्रेम मिळवून दिले आहे. प्रेक्षकांना माझी भूमिकादेखील आवडेल याची मला खात्री आहे. 

Web Title: Chetan Hansraj's entry will be done in Peshwa Bajirao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.