शंभूराजेंच्या भूमिकेत मराठी अभिनेता हवा म्हणणाऱ्या अभिनेत्याने पाहिला 'छावा', म्हणतो- "विकी कौशल..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:31 IST2025-02-18T16:26:44+5:302025-02-18T16:31:21+5:30
'छावा'चा ट्रेलर पाहिल्यानंतर अजिंक्यने संभाजी महाराजांच्या भूमिकेत मराठी अभिनेता हवा होता, असं म्हटलं होतं. आता 'छावा' सिनेमा पाहिल्यानंतर त्याने कौतुक केलं आहे.

शंभूराजेंच्या भूमिकेत मराठी अभिनेता हवा म्हणणाऱ्या अभिनेत्याने पाहिला 'छावा', म्हणतो- "विकी कौशल..."
विकी कौशलचा 'छावा' सिनेमा सध्या सगळीकडेच गाजत आहे. या सिनेमाचं आणि विकी कौशलच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. विकी कौशलने या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. पण, सुरुवातीला विकी कौशलला संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून काहींनी आक्षेप नोंदविला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत मराठी अभिनेता हवा होता असं मत एका मराठी अभिनेत्याने मांडलं होतं. आता त्याने छावा सिनेमा पाहिला आहे. हा अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत आहे.
'छावा'चा ट्रेलर पाहिल्यानंतर अजिंक्यने संभाजी महाराजांच्या भूमिकेत मराठी अभिनेता हवा होता, असं म्हटलं होतं. आता 'छावा' सिनेमा पाहिल्यानंतर त्याने कौतुक केलं आहे. अजिंक्यने त्याच्या नॉन मराठी मित्रमैत्रिणींसोबत 'छावा' सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. "छावासारखा मास्टरपीस पाहून भावनिक झाल्यानंतर आम्हाला याची जाणीव झाली की हे आयुष्य अधिक जबाबदारीने जगलं पाहिजे. ते सर्वांचे राजे होते. आणि आपल्या हृदयात कायम राहतील", असं त्याने म्हटलं आहे.
"असा पुत्र होता आमच्या “छत्रपती शिवरायांचा”. पराक्रमी योद्धा, एकही युद्ध न हरणारे स्वराज्य रक्षक,. ज्वलंत-कीर्तिमंत असे धर्मवीर शिवपुत्र,. शिवबाचा छावा , छत्रपती संभाजी महाराज...कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसोबत हा सिनेमा नक्की बघा. लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल या उत्कृष्ट सिनेमासाठी आभार", असंही पुढे अजिंक्यने म्हटलं आहे.