'मुजरा फक्त महाराजांना, तत्व म्हणजे...'; शिवजयंतीनिमित्त मराठी अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 18:11 IST2024-02-19T17:42:45+5:302024-02-19T18:11:36+5:30
Ruchira jadhav: रुचिराने बिग बॉस मराठीच्या घरातील आठवण शेअर करत महाराजांप्रतीचा आदर व्यक्त केला आहे.

'मुजरा फक्त महाराजांना, तत्व म्हणजे...'; शिवजयंतीनिमित्त मराठी अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट व्हायरल
आज शिवजयंती असल्यामुळे सगळीकडे शिवमय वातावरण झालं आहे. अनेक ठिकाणी शिवजयंतीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्येच सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्येच मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) हिने पोस्ट शेअर करत चाहत्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या तिची ही पोस्ट चर्चेत येत आहे.
काय आहे रुचिराची पोस्ट?
#महाराज. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवजयंतीच्या निमित्ताने एक आठवण share कराविशी वाटते. Big boss च्या घरात असताना दर आठवड्याला Entertainment day च्या दिवशी कोणी ना कोणी पाहुणे येत असत. असंच एका Friday ला एक प्रतिष्ठित व्यक्ती आली होती, जी स्वतः कलाकार होती तसेच राजकारणाशी सुद्धा संबंधित होती. कार्यक्रम झाल्यावर त्यांना आदराने see off करताना आमच्यापैकी एकाने कोणीतरी “ए चला, त्यांना मुजरा करूया” असं म्हटलं. मग काय, सगळ्यांनी वाकून मुजरा केला. मी मात्र तशीच उभी होते. मला विचारलं, तू का मुजरा केला नाहीस. मी म्हटलं, “मुजरा फक्त महाराजांना” ! तत्व म्हणजे तत्व. दिखावा मला कधी जमला नाही आणि जमणार ही नाही आणि कोणासमोर झुकायचं, कोणासमोर नाही हेच जर कळलं नाही, तर काय शिकलो आपण महाराजांकडून. मुजरा राजे..जय शिवराय, अशी आठवण सांगत रुचिराने ही पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, रुचिरा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून ती सोशल मीडियावर कायम चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. 'बिग बॉस मराठी', 'माझे पती सौभाग्यवती',' प्रेम हे', 'तुझ्यावाचून करमेना', 'माझ्या नवऱ्याची बायको' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.