छवि मित्तलनं ब्रेस्ट कॅन्सरशी लढाई जिंकली पण.., बिकनीतले फोटो शेअर करत दाखवल्या सर्जरीच्या खुणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 16:00 IST2022-12-29T15:59:30+5:302022-12-29T16:00:01+5:30
Chhavi Mittal : छवी मित्तलने ब्रेस्ट कॅन्सरची लढाई जिंकली आहे. अलीकडेच तिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

छवि मित्तलनं ब्रेस्ट कॅन्सरशी लढाई जिंकली पण.., बिकनीतले फोटो शेअर करत दाखवल्या सर्जरीच्या खुणा
छवी मित्तल ही टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. छवी काही काळापूर्वी ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होती, ज्याबद्दल तिने तिच्या चाहत्यांना प्रत्येक अपडेट देखील दिले होते. छवी मित्तलने ब्रेस्ट कॅन्सरची लढाई जिंकली आहे. अलीकडेच तिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. छवीने या पोस्टमध्ये तिच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या शस्त्रक्रियेच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.
छवि मित्तलने व्हाईट बिकीनीमध्ये आपला बॅकसाईड फोटो शेअर केला आहे ज्यात ती स्माईल करत पोझ देते आहे. तिच्या पाठच्या बाजूला तिनं एक टॅटूही काढला आहे. या फोटोत ती खूप आनंदही दिसते आहे. तिनं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवर हा फोटो शेअर करत लिहिले की, या वर्षात मी हे कमावलं आहे. एक नवीन आयुष्य, जे अत्यंत सुंदर आणि कणखर आहे. तिच्या चाहत्यांनीही तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ज्यावर खुद्द छवीनेही रिप्लाय दिला आहे. एका कमेंटमध्ये ती म्हणते की, तुमच्या प्रेमाच्या शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद!
यावर्षीच्या एप्रिलमध्ये छवीला स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. ती आपल्या रिकव्हरीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिनं असं सांगितलं की मी माझ्या आजाराच्या रिकव्हरीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते आहे. याला खूप धाडस लागते कारण मला कर्करोग निदान झाल्यावर कोणीच असे सांगितले नाही की या आजारानंतरच आयुष्य कसे असते. सगळ्यांनीच मला वेगवेगळ्या थेरपींबद्दल सांगितलं. पण मी जे अनुभवते ते खूप वेगळे आहे. त्याचसोबत मी माझ्या डॉक्टरसोबतही हेही सतत विचारते की माझे आयुष्य या आजारानंतर कसे राहिले. तेव्हा मी माझ्या प्रत्येक पोस्ट शेअर करत असते. माझे आयुष्य हे ट्रीटमेंटनंतरही चांगलंच आहे. त्यात काहीच गंभीर नाही. हा आज गंभीर आहे पण त्याचं वेळीच निदान झालं ते तुम्ही त्यातून नक्कीच बाहेर पडू शकता.