‘विघ्नहर्ता गणेश’ मध्ये बाल-कलाकार इशांत भानुशालीची एंट्री !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 07:00 PM2019-04-28T19:00:00+5:302019-04-28T19:00:00+5:30
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘संकट मोचन महाबली हनुमान’ या मालिकेत हनुमानाची भूमिका करणारा बाल-कलाकार इशांत भानुशाली लवकरच ‘विघ्नहर्ता गणेश’ मालिकेत दिसणार आहे.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘संकट मोचन महाबली हनुमान’ या मालिकेत हनुमानाची भूमिका करणारा बाल-कलाकार इशांत भानुशाली लवकरच ‘विघ्नहर्ता गणेश’ मालिकेत दिसणार आहे. मालिकेच्या आगामी भागांमध्ये पहिल्यांदाच भारतीय टेलिव्हिजनवर शिवाचे 19 अवतार दाखवण्यात येणार आहेत. इशांत यात शिवाचा पहिला अवतार ‘पिपलद’च्या भूमिकेत दिसेल.
इशांत आपल्या भूमिकेबाबत म्हणाला, ''मी भगवान शिवाचा पहिला अवतार ‘पिपलाद’ साकारणार आहे. मी भक्तांना नेहमी पिंपळाच्या झाडाची पूजा करताना बघितले आहे, पण माझ्यासकट बहुतांशी भक्तांना आपण ही पूजा का करतो, यामागील कारण माहीत नसते. मी खूप भाग्यवान आहे की मला ही भूमिका मिळाली कारण भगवान गणेशाच्या कथा मला आवडतात इतकेच नाही तर या मालिकेमुळे मला त्या कथा सखोल समजण्यास मदत होईल तसेच या भागामुळे पिंपळाचे झाड पूजण्यामागची अनोखी कहाणी सर्वांनाच कळेल. शिवाय, ही माझी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील दुसरी मालिका आहे, या आधीची ‘संकट मोचन महाबली हनुमान’ ही मालिकाही मला खूप आवडली होती, आणि तेव्हा मी हनुमानाची भूमिका जेवढ्या आवडीने करत होतो तेवढ्याच आवडीने आताही सगळ्या कलाकारांबरोबर मी शूटिंगची मजा घेत आहे.''
मालिकेच्या आगामी भागांमध्ये शिवाचे 19 अवतार बघायला मिळतील अनुक्रमे पिपलाद, नंदी, वीरभद्र, भैरव, अश्वत्थामा, शर्भावतार, गृहपती, दुर्वास, हनुमान, वृषभ, यतिनाथ, कृष्णदर्शन, ब्रह्मचारी, भिक्षुवर्य, सुरेश्वर, किरात, सुंवर्तक, यक्षेश्वर आणि अवधूत या भूमिका अनुभवी अभिनेता मलखान सिंहने साकारल्या आहेत.