'रंग माझा वेगळा'मधून बालकलाकर स्पृहा दळीची एक्झिट, म्हणाली - 'आज शेवटचं...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 20:04 IST2023-03-04T20:04:10+5:302023-03-04T20:04:34+5:30
Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेचे कथानक १४ वर्षांनी पुढे सरकणार आहे. त्यामुळे मालिकेतील दीपिका आणि कार्तिकी मोठ्या झालेल्या पाहायला मिळणार आहेत.

'रंग माझा वेगळा'मधून बालकलाकर स्पृहा दळीची एक्झिट, म्हणाली - 'आज शेवटचं...'
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा(Rang Maza Vegla)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. आता मालिकेचे कथानक १४ वर्षांनी पुढे सरकणार आहे. त्यामुळे मालिकेतील दीपिका आणि कार्तिकी मोठ्या झालेल्या पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आता मालिकेतून छोट्या दीपिका आणि कार्तिकी म्हणजेच बालकलाकार स्पृहा दळी आणि मैत्रेयी दाते यांची एक्झिट होणार आहे. आज त्यांचा शेवटचा भाग प्रसारीत झाला आहे. या निमित्ताने स्पृहाने इंस्टाग्रामवर मालिकेतील काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
स्पृहा दळी हिने लिहिले की, On last time ........आज मी तुमच्या लाडक्या दीपिका ह्या व्यक्तिरेखेतून स्टार प्रवाह चॅनलवर आपणा सर्वांना दिसणार आहे ."रंग माझा वेगळा" ही माझी पहिली सीरिअल, खरेतर माझे ह्या इंडस्ट्री मधले पहिले पाऊल. मला आजही आठवते अतुल सर व अपर्णा मॅडम माझे प्रोड्युसर, माझे डायरेक्टर्स चंदू सर आणि स्वप्नील सर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, त्यांनी माझ्या कडून तुमची लाडकी दीपिका व्यक्तिरेखा घडवून घेतली आणि तिच्यावर तुम्ही भरभरून प्रेम केले , पाहता पाहता माझे ४७२ एपिसोड झाले.
ती पुढे म्हणाली की, आणि हो अश्या प्रकारे माझी ह्या इंडस्ट्री मध्ये एन्ट्री झाली आणि तो क्षण आलाच माझ्या घरी स्टारची परी देखील आली........ माझा पहिला अवॉर्ड "सर्वोत्कृष्ट बाल कलाकार २०२२" व माझा दुसरा अवॉर्ड " सर्वोत्कृष्ट मुलगी २०२३" !!
स्पृहाने मालिकेतील सर्वांचे आभार मानले आहेत. तिने या पोस्टमध्ये म्हटले की, रंग माझा वेगळा या सिरीयलने मला खूप मोठी ओळख मिळवून दिली त्याबद्दल माझे सर्व सहकलाकार ज्यांनी मला खूप शिकवले लाला आजोबा, ग्रँड मा हर्षदा ताई , राधा आई पूर्णिमा माऊ, डयाडा आशु दादा, आई रेशमा माऊ, अनघा माऊ, विदीशा माऊ, आदी कॅक्स, माझी बहिण मैत्रेयी, मानसी माऊ, अश्विनी माऊ, कमला माऊ मयुरी मोहिते व इतर , तसेच मला सीनसाठी तयार करणारे माझे सगळे ताई आणि दादा (makeup and Hair Artist ), माझी काळजी घेणारे माझे स्पॉट दादा आणि मला सीनसाठी मदत करणारी माझी सगळी डीरेक्शन टीम , प्रशांत दादा व वैभव दादा ........रंग माझा वेगळा ह्या सिरीयल ची संपूर्ण टीम. माझे प्रोड्युसर @rightclickmidiasolution @shashisumeetproduction आणि चॅनेल @star_pravah @nandini mam, @statishrajwade sir , @monika ताई , @shama ताई या सर्वांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल खूप खूप आभार. Last but not least @neha माऊ जिने माझ्या वर खूप खूप प्रेम केले 😘 love u तसेच माझे संपूर्ण कुटुंब ज्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आणि खूप खूप आशीर्वाद दिले व तुम्ही सर्व रसिकप्रेक्षक......तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार.