ही चिमुकली आहे ‘राणा दा’ची जबरा आणि एक नंबरची फॅन !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 09:27 AM2017-08-28T09:27:52+5:302017-08-28T14:57:52+5:30

बाप्पाचं सर्वत्र आगमन झालं आहे. लहानथोर सारेच गणरायाच्या भक्तीमध्ये लीन झाले आहेत. श्रीगणेशापुढे सारेच नतमस्तक होतात. गरीब, श्रीमंत किंवा ...

This chimukula is 'Rana da' and a number fan! | ही चिमुकली आहे ‘राणा दा’ची जबरा आणि एक नंबरची फॅन !

ही चिमुकली आहे ‘राणा दा’ची जबरा आणि एक नंबरची फॅन !

googlenewsNext
प्पाचं सर्वत्र आगमन झालं आहे. लहानथोर सारेच गणरायाच्या भक्तीमध्ये लीन झाले आहेत. श्रीगणेशापुढे सारेच नतमस्तक होतात. गरीब, श्रीमंत किंवा मग सेलिब्रिटी प्रत्येकासाठी बाप्पा हा खास असतो. त्यामुळे त्याची आराधना करण्यात सारेच दंग होतात. यांत सेलिब्रिटी मंडळीसुद्धा मागे नसतात. वर्षभर मालिका, सिनेमा, नाटक यांत बिझी असणारे कलाकारसुद्धा बाप्पाच्या उत्सव काळात सुट्टी घेतात. या काळात ते मनोभावे आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा करतात. अशा बाप्पाचे अनेक सेलिब्रिटी भक्त आहेत. बहुतांशी सेलिब्रिटी आपल्या घरी लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करुन पूजा करतात. तर काही सेलिब्रिटी सार्वजनिक मंडळाच्या गणपतीसमोर नतमस्तक होतात. अशाच एका सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे छोट्या पडद्यावरील सा-यांचा लाडका राणा दा अर्थातच अभिनेता हार्दिक जोशी. त्याच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणा दा साकारणा-या हार्दिक जोशीचा अभिनय सा-यांनाच चांगला भावतो आहे. भोळाभाबडा आणि रांगड्या राणा दाचा अवतार रसिकांना चांगलाच पसंत पडतो आहे. या मालिकेमुळे हार्दिकचे अनेक फॅन बनले आहेत. मात्र हार्दिकची एक नंबरची फॅन आहे ती म्हणजे एक चिमुकली. तिचं वय आहे अवघं एक महिना. ही चिमुकली आपल्या सगळ्यात मोठी फॅन असल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. सोशल मीडियावर गणपतीसमोर राणा दा नतमस्तक होतानाचा हा फोटो आहे. राणा दासोबत ही एक महिन्याची चिमुकलीसुद्धा आहे. या फोटोला रसिकांची आणि खासकरुन राणा दाच्या फॅन्सची पसंती मिळत आहे.सोशल मीडियावर या फोटोला कमेंट्सही मिळत आहेत. आता ही चिमुकली आणि राणा दाची सगळ्यात एक नंबर फॅन कोण अशी विचारणाही या कमेंट्सच्या माध्यमातून करण्यात येत आहे.  

Web Title: This chimukula is 'Rana da' and a number fan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.