आईच्या आठवणीत भावूक झाली प्रसिद्ध कोरियोग्राफर गीता कपूर, जानेवारी महिन्यात झाले होते निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 07:51 PM2021-02-13T19:51:51+5:302021-02-13T19:56:13+5:30
गीता कपूरच्या आईचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गीता कपूरची आई राणी कपूर गेल्या काही वर्षापासून आजारी होत्या. गीता कपूरने अखेरच्या क्षणापर्यंत आईची सेवा केली.
बॉलिवूडची प्रसिद्ध कोरीयोग्राफर गीता कपूरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर नुकतीच भावूक पोस्ट शेअर करत आईच्या निधनाची बातमी सांगितली. 2020 वर्ष बर्याच वाईट आणि निराशाजनक बातम्यांनी भरले होते. २०२० या वर्षात बॉलिवूडमधून अनेक वाईट बातम्या समोर आल्या. अनेक सेलिब्रेटींनी अलविदा म्हटले तर काहींनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींंना गमावले.
अनेकजण 2020 ला निरोप घेताना 2021 चे स्वागत करत होते तेव्हा आम्ही आणि आमच्या आसपास सर्व काही ठीक होईल अशी प्रार्थना करत होतो. प्रसिद्ध कोरियोग्राफक गीता कपूर यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत त्यांच्या आईच्या निधनाची बातमी दिली आहे. जानेवारी महिन्यात गीता कपूरच्या आईचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गीता कपूरची आई राणी कपूर गेल्या काही वर्षापासून आजारी होत्या. गीता कपूरने अखेरच्या क्षणापर्यंत आईची सेवा केली.
गीता कपूरने पोस्टच्या सुरुवातीला लिहीले की, महिना उलटला आहे तिला जाऊन, जवळचे मित्र मंडळी सगळ्यांनीच तिला भरभरुन प्रेम दिले, गेल्या काही वर्षापासून ती आजारी होती. अनेकांनी तिच्या आजाराशी झुंज पाहिली होती. अखेर आता तिला शांती मिळाली आहे. 'कोविड-19' बिकट परिस्थितीमुळेच आम्ही बातमी सांगितली नव्हती. ज्यांना कळाले त्यांनीही संयम राखला त्यांची मी विशेष आभारी आहे ज्यांना आम्ही ही बातमी वेळेवर देऊ शकलो नाही त्यांच्यासाठी मी दिलगीरी व्यक्त करते. गीताने आई रानी कपूर यांचा फोटो शेअर करत आपल्या मनातल्या वेदना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. गीताच्या अनेक चाहत्यांसह सेलिब्रेटींनी देखील श्रद्धांजली वाहत गीता कपूरला धीर देत तिचे सांत्वन केले आहे.