"तोंड शिवलं होतं का तुमचं?" छोटा पुढारी आणि DP मध्ये झाली हमरीतुमरी, घरात नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:39 IST2024-08-09T16:38:44+5:302024-08-09T16:39:16+5:30
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज DP आणि घनःश्याममध्ये वादाची ठिणगी पडलेली दिसली (Bigg Boss Marathi 5)

"तोंड शिवलं होतं का तुमचं?" छोटा पुढारी आणि DP मध्ये झाली हमरीतुमरी, घरात नेमकं काय घडलं?
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा प्रोमो रिलीज झालाय. गेले दोन आठवडे घरात शांत असलेले आणि एकमेकांच्या विरोधात काहीही न बोलणारे धनंजय पोवार अर्थात DP आणि छोटा पुढारी अर्थात घनःश्याम दरवडे यांच्यात वादाची ठिणगी पडलीय. घरात पहिल्या आठवड्याला घनःश्यामने धनंजयला नॉमिनेट केलं होतं. पण तरीही घनःश्याम आणि धनंजयमध्ये चांगला संवाद पाहायला मिळाला. पण नुकत्याच रिलीज झालेल्या बिग बॉसच्या नवीन प्रोमोत घनःश्याम आणि DP मध्ये वादाची ठिणगी पडलेली दिसली.
घनःश्याम आणि DP त वादाची ठिणगी
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये धनंजय पुढारीला विचारतोय,"पुढारी तुमच्याकडे किती कामं आहेत?". त्यावर पुढारी एक असं उत्तर देतो. त्यावर धनंजय म्हणतो,"तोंड शिवलं होतं का आता विचारताना". त्यानंतर छोटा पुढारी घन:श्यामला म्हणतो,"तोंड शिवलं का ही कोणती पद्धत आहे बोलायची". त्यावर धनंजय म्हणतो,"मला वाटेल ते मी बोलेल".
सख्खे दोस्त झाले पक्के वैरी
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य कधी एकमेकांसोबत चांगले असतील आणि कधी त्यांच्यात वाद निर्माण होईल हे सांगू शकत नाही. आजच्या भागातही छोटा पुढारी घन:श्याम दरवडे आणि धनंजय पोवारमध्ये शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळणार आहे. या दोघांमध्ये नेमकी कोणाची चूक झाली आणि कोण बरोबर? हे आजच्या भागांमध्ये पाहायला मिळेल. याशिवाय या आठवड्यात कोण घराबाहेर जाईल ते सुद्धा रविवारी कळेलच.