Video: अंकिताच्या कॅप्टनसीखाली छोटा पुढारीचा हट्टीपणा! घरात साफसफाई करायला दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 10:40 AM2024-08-07T10:40:33+5:302024-08-07T10:41:38+5:30

अंकिता कॅप्टन झाल्यावर छोटा पुढारी घनःश्यामने घरातील कामं करायला नकार दिला (ankita walawalkar, bigg boss marathi 5)

chota pudhari ghanashyam darode saying no to doing work in bigg boss marathi 5 under ankita walawalkar captaincy | Video: अंकिताच्या कॅप्टनसीखाली छोटा पुढारीचा हट्टीपणा! घरात साफसफाई करायला दिला नकार

Video: अंकिताच्या कॅप्टनसीखाली छोटा पुढारीचा हट्टीपणा! घरात साफसफाई करायला दिला नकार

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये हळूहळू रंगत निर्माण होतेय. यंदाच्या सीझनमध्ये सहभागी झालेले सर्व स्पर्धक वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचे असल्याने प्रत्येकजण स्वतःची वेगळी ओळख जपण्यास यशस्वी होत आहे. अशातच बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमधील पहिलं कॅप्टनसी कार्य काल पार पडलं. या कार्यात कोकण हार्टेड गर्ल अर्थात  अंकिता वालावलकर घरातील पहिली कॅप्टन झाली. अंकिता कॅप्टन झाल्यावर घरातील सदस्यांना ती ड्यूटी वाटून देत होती. त्यावेळी घनःश्यामने ड्यूटी करायला नकार दिलेला दिसला. 

छोटा पुढारीने दिला ड्यूटी करायला नकार

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत अंकिताला छोटा पुढारीशी बोलताना दिसत आहे. अंकिताने छोटा पुढारीला बेडरुम आणि बाहेरची साफसफाई करायला सांगितली. त्यावर छोटा पुढारीचं म्हणणं होतं, "मला एकट्याला जमायचं नाही. मला कोणतरी माणूस द्या." त्यावर अंकिता म्हणते, "अहो फक्त १५ मिनिटाचं काम आहे. एवढासा कचरा असतो. तुम्ही करणार आहात की नाही मग तसं मला पुढचा निर्णय घ्यायला". पुढे छोटा पुढारी अंकिताला नकार कळवतो.


अंकिता झाली घराची पहिली कॅप्टन

बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये पहिली कॅप्टन कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर झाली आहे. काल बिग बॉसमध्ये कॅप्टनसीची बुलेट ट्रेन हे कार्य झालं. या कार्यात शेवटी पॅडी कांबळे, अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, निक्की तांबोळी हे स्पर्धक कॅप्टनसीपदाचे उमेदवार होते. शेवटी योगिताला कॅप्टन निवडायचा होता. तिने अंकिताचं नाव घेतलं. त्यामुळे अंकिता बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची पहिली कॅप्टन झाली.

 

Web Title: chota pudhari ghanashyam darode saying no to doing work in bigg boss marathi 5 under ankita walawalkar captaincy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.